दुष्काळी निºहाळेत पहिल्यांदाच रब्बीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:14 PM2019-10-17T23:14:17+5:302019-10-18T01:03:45+5:30
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त असलेल्या निºहाळे-फत्तेपूर परिसरातील सर्वच बंधारे यावर्षी भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदा रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळी भागात गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच रब्बीची पिके येणार आहेत.
निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त असलेल्या निºहाळे-फत्तेपूर परिसरातील सर्वच बंधारे यावर्षी भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदा रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळी भागात गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच रब्बीची पिके येणार आहेत.
निºहाळे-फत्तेपूर परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात नेहमी टॅँकरवर आपली तहान भागवावी लागते. काही वर्षे तर वर्षभर या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू होते. यावर्षी भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पूरपाणी नदी व चारीद्वारे परिसरातील बंधाºयात सोडण्यात आल्याने बंधाऱ्यांमध्ये पाणी आले आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्गाच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
खरिपाच्या हंगामातील बाजरीची पिके पावसामुळे वाया गेली आहेत. बाजरीचे उत्पन्न घटले असले तरी आता शेतकरी राज्याच्या नजरा पुढील रब्बी पिकांकडे लागून राहिल्या आहेत. निºहाळे-फत्तेपूर परिसरातील बंधारे ओव्हर फ्लो झाल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेतकºयांचे लक्ष आता रब्बी पिकांच्या उत्पादनाकडे लागून राहिले आहे. निºहाळे-फत्तेपूर परिसरातही समाधानकारक असा पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील नदी-नाले बंधारे कोरडे पडले होते. परिसरात मध्यम पाऊस पडला त्यामुळे पूर येईल किंवा बंधारे भरतील एवढा पाऊस झाला नव्हता.
तथापि, भोजापूर धरणाचे पूरपाणी नदीने परिसरात आल्याने व बंधारे भरल्याने शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.
निºहाळे-फत्तेपूर परिसरातील शेतकरी आता हिरवा चारा, गहू, हरबरा या पिकात वाढ होईल. यावर्षी पहिल्यांदाच दिवाळीत टॅँकरची वाट पाहावी लागणार नाही.