अपेक्षित ऑक्सिजन ५० टन मिळाला केवळ २३ टन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:30+5:302021-04-25T04:14:30+5:30

नाशिक : जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणमहून आलेल्या ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’च्या माध्यमातून दोन टँकरद्वारे २७.८२६ टन ऑक्सिजन प्राप्त झाला ...

Expected 50 tons of oxygen only 23 tons! | अपेक्षित ऑक्सिजन ५० टन मिळाला केवळ २३ टन !

अपेक्षित ऑक्सिजन ५० टन मिळाला केवळ २३ टन !

Next

नाशिक : जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणमहून आलेल्या ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’च्या माध्यमातून दोन टँकरद्वारे २७.८२६ टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे. त्यातीलदेखील ४ मेट्रिक टन ऑक्सिजन धुळ्याला द्यावा लागणार असल्याने नाशिकला केवळ २३.८२० टन इतकाच साठा मिळाला आहे. प्रत्यक्षात नाशिकला ५० टन ऑक्सिजन मिळणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला असताना प्रत्यक्षात त्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा नाशिकला मिळाला आहे.

इन्फो

नाशिक रेल्वेस्थानकावर उतरलेल्या चार टँकरमध्ये मिळून एकूण ५२.५६० मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन उतरविण्यात आला. त्यात नाशिक जिल्ह्यासाठी एकूण २७.८२६ मेट्रिक टन आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी २४.७३६ मेट्रिक टन असा ऑक्सिजन मिळाला. त्यातही नाशिकच्या ऑक्सिजनपैकी चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा धुळे जिल्ह्यास देण्यात येणार आहे. यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी २३.८२० मेट्रिक टन इतका साठा शिल्लक राहणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी कळविले आहे.

Web Title: Expected 50 tons of oxygen only 23 tons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.