जिल्ह्यात २३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्व

By admin | Published: May 27, 2016 10:19 PM2016-05-27T22:19:34+5:302016-05-27T23:12:09+5:30

तयारी : वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळाचे नियोजन

Expected to achieve 23 lakh trees in the district | जिल्ह्यात २३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्व

जिल्ह्यात २३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्व

Next

नाशिकरोड : राज्यात शासनाकडून १ जुलै रोजी २ कोटी वृक्षांची लागवड केली जाणार असून, नाशिक विभागामध्ये ६९ लाख, तर नाशिक जिल्ह्यामध्ये २३ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. याकरिता वनविभाग, सामाजिक वनीकरण व वनविकास महामंडळाकडून नाशिक विभागात जवळपास ५३ लाख खड्डे खोदून तयार आहेत.
राज्य शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी १ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी २ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाची ‘गिनिज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद व्हावी याकरिता वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत असून, शासनाच्या इतर विविध विभागांचीदेखील मदत घेण्यात येत आहे.
विभागात ६९ लाख रोपे लावणार
वनविभागाकडे मोठी जमीन असल्याने त्यांना उद्दिष्ट सर्वाधिक जादा प्रमाणात देण्यात आले असून दोन कोटींपैकी जवळपास दीड कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत लावण्यात येणारी झाडे- नाशिक वनविभाग - २० लाख ६० हजार १९७, सामाजिक वनीकरण - २५ हजार, वनविकास महामंडळ - २९ हजार ९९७ व शासनाच्या विविध खात्याकडून १ लाख ७८ हजार ३३५ एकूण २२ लाख ९४ हजार २२९ झाडे लावण्यात येणार आहे. धुळे वनविभाग - ५ लाख, सामाजिक वनीकरण - १५ हजार, इतर शासकीय कार्यालय - १ लाख ५० हजार (एकूण ६ लाख ६५ हजार), जळगाव वनविभाग - ९ लाख ८० हजार, सामाजिक वनीकरण - २० हजार, इतर शासकीय कार्यालय - २ लाख ७५ हजार (एकूण १२ लाख ७५ हजार), अहमदनगर वनविभाग - १४ लाख १० हजार ७००, सामाजिक वनीकरण - २५ हजार, इतर शासकीय कार्यालय - २ लाख ३४ हजार (एकूण १६ लाख ६९ हजार ७००), नंदुरबार वनविभाग - ७ लाख ५२ हजार, सामाजिक वनीकरण - १५ हजार, वनविकास महामंडळ- ३३ हजार, इतर शासकीय कार्यालय - २ लाख ५ हजार २७५ (एकूण १० लाख ५ हजार २७५) वृक्षांचे रोपण केले. जाणार आहे. नाशिक विभागात एकूण ६९ लाख ९ हजार २२४ झाडे लावण्यात येणार आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ यांच्याकडून ५८ लाख ६६ हजार ६१४ वृक्षांचे रोपण केले जाणार असून, त्याकरिता ५३ लाख ८ हजार ८४९ खड्डे खोदून वृक्षलागवडीसाठी तयार आहेत, तर इतर शासकीय विभागामार्फत वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदल्याची माहिती अद्याप वनविभागाकडेच उपलब्ध झालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Expected to achieve 23 lakh trees in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.