अपेक्षित ‘साहित्यिक’ अपेक्षाभंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:06 AM2019-07-23T01:06:38+5:302019-07-23T01:06:57+5:30
महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची घोषणा हा नाशिकच्या साहित्यिक वर्तुळासाठी अपेक्षित अपेक्षाभंग ठरला आहे.
नाशिक : महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची घोषणा हा नाशिकच्यासाहित्यिक वर्तुळासाठी अपेक्षित अपेक्षाभंग ठरला आहे.
गत आठवड्याच्या प्रारंभी ढाले पाटील आणि तथाकथित ‘संमेलन स्थळ पाहणी समिती’ यांनी पाच स्थळांवर जाऊन ‘नाशिक दर्शन’ केले. मराठी साहित्य संमेलन नाशकात भरवायचे की उस्मानाबादला याबाबतचा निर्णय घेण्यासाठी या स्थळ पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करतानादेखील पाटील यांनी नाशिकचे भौगोलिक स्थान, हवामान, जागा, पाणी उपलब्धता या सर्व बाबींपेक्षा आयोजकांकडून कशा प्रकारच्या ‘तयारी’चे आश्वासन मिळते, त्याचा आढावा घेऊनच ‘समिती’ निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. सध्याच्या दुष्काळजन्य स्थितीत उस्मानाबाद सारख्या सदैव पाणीप्रश्न असणाºया जिल्ह्यात साहित्य संमेलन भरवणे कितपत योग्य ठरेल ? या प्रश्नावर ढाले पाटील यांनी तेथील आयोजकांनी पाण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे सांगताच संमेलनाचे ‘पाणी’ कोणत्या उताराकडे धावत आहे आणि कुठे मुरणार आहे ? तेच सूचित झाले होते. त्यात महामंडळाचे कार्यालय मराठवाड्यात स्थलांतरित झाले असल्याने हे अपेक्षितच होते.
स्वागताध्यक्ष निवडीत पडले उणे
नाशिकला आलेल्या स्थळ पाहणी समितीमधील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर नाशिककर ‘भक्कम स्वागताध्यक्ष’ निवडण्यातच कमी पडल्याने नाशिकला स्थळ निवडीत यंदा पसंती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘सावानाच्या पुढाकाराने सर्व नाशिककरांचे संमेलन’ ही कल्पना ऐकायला रम्य वाटत असली तरी ‘संमेलन भरवणे’ नामक बाजारात ती पिछाडीवर पडणारी असते, अशी सूचनादेखील केली.
नाशिकच्या पाहणी दौºयात अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, नाशिकमध्ये दोनवेळा संमेलन झाले असून, मागील संमेलन १३ वर्षांपूर्वीच झाले आहे, तर उस्मानाबादला अद्याप एकदादेखील संमेलन झालेले नाही. त्यामुळे पोट भरलेल्याला पुन्हा द्यायचे की उपाशी असलेल्याला त्याबाबत त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य म्हणता येत नाही.
- किशोर पाठक, उपाध्यक्ष, सावाना