प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:56 PM2020-01-08T22:56:25+5:302020-01-08T22:56:50+5:30
गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
कळवण : गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
नगरपंचायतीच्या कर्मचाºयांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे नागरपंचायतीच्या सेवेवर परिणाम होणार आहे. ग्रामपंचायती बरखास्त करून त्याचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायतीमध्ये सफाई, संगणक आॅपरेटर, पाणीपुरवठा व आदी विभागातील कर्मचारी गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत. मयत झालेल्या कर्मचाºयाच्या कुटुंबाला सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपाखाली नोकरी मिळावी, नागरपंचायतीमधील कर्मचाºयांना सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, सफाई कामगारांचे शासकीय सेवेत समावेशन करावे, तसेच रोजदारी कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायत जे कर्मचारी वसुली कारकून पदावर कार्यरत होते त्यांना नगरपंचायत सेवेत शिपाईपदाचा आदेश देण्यात आलेला आहे. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विक्र म निकम, ताराबाई गोयर, जिजाबाई बस्ते, अशोक अहिरे, संजय आहेर, भाऊराव पगार, रामराव सोनवणे, बापू आहेर, किरण निकम, कैलास पगार, रोशन निकम, रमेश पगार, बेबीबाई बस्ते, उज्ज्वला बस्ते, जीवन सोनवणे, भीमाबाई बस्ते, कमल केदार, सिंधूबाई गोयर, संगीता बस्ते, दगा पगार आदी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायत व नगरपंचायत सेवा धरून आज २५ वर्षे झाली आहे, जेव्हा ते सेवेत रु जू झाले तेव्हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असण्याची अट होती. त्यांना लिपिकपदावर घेण्यात यावे व यासह सर्व कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के भत्ता फरकासह मिळावा या मागण्यांसाठी आज कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीतील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.