५० आमदारांचा खर्च ५० रुपये सिलिंडर दरवाढीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 01:51 AM2022-07-08T01:51:28+5:302022-07-08T01:52:14+5:30

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बंडखोर ५० आमदारांवर केलेल्या खर्चाची रक्कम मोदी सरकार गॅस सिलिंडरच्या दरवाढीतून वसूल करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

Expenditure of 50 MLAs from Rs. 50 per cylinder price hike | ५० आमदारांचा खर्च ५० रुपये सिलिंडर दरवाढीतून

५० आमदारांचा खर्च ५० रुपये सिलिंडर दरवाढीतून

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी महिला काँग्रेसचा आरोप : सरकारच्या विरोधात आंदोलन

नाशिक : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बंडखोर ५० आमदारांवर केलेल्या खर्चाची रक्कम मोदी सरकार गॅस सिलिंडरच्या दरवाढीतून वसूल करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी रस्त्यावर गॅस सिलिंडर, गोवऱ्या व लाकडाचे सरपण ठेवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सेनेच्या बंडखोर आमदारांवर केलेला खर्च मोदींनी पद्धतशीर वसूल करण्यास सुरुवात केली असून, मोदी सरकारने पुन्हा गृहिणींच्या माथी लाकडाची मोळी लादली आहे. सिलिंडरसाठी नागरिकांना १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजाराचा आकडा पार केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून, भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी महिला आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत ‘बहोत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्वसामान्य जनतेला गॅस परवडणार नाही म्हणून आंदोलकांकडून लाकडाच्या मोळी व गोवऱ्या भेट देण्यात आल्या. यावेळी, सुवर्णा गांगोडे, शीतल भोर, संगीता राऊत, भारती खिरारी, ज्योती भोर, मंगल माळी, सुरेखा कुऱ्हाडे, रूपाली अहिरे, निशा झनके, रूपाली तायडे, वैशाली ठाकरे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, भारती भोई, वर्षा लिंगायत, सरिता पगारे, योगिता आहेर, सुरेखा पठाडे, संगीता पाटील आदी महिला उपस्थित होत्या.

(फोटो डेस्कॅन)

Web Title: Expenditure of 50 MLAs from Rs. 50 per cylinder price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.