मार्केटच्या जागेवरील अभ्यासिकेवर ६२ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:49 PM2020-01-18T23:49:04+5:302020-01-19T01:00:12+5:30
मोटवाणीरोडवरील शाहूनगर येथे मार्केटचे आरक्षण असताना त्याठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आली तर आहेच, शिवाय ताब्यात नसताना या इमारतीवर महापालिका वर्षानुवर्षे खर्च करीत आहे. या वादग्रस्त अभ्यासिकेसाठी आणखी ६२ लाख रुपये खर्च करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी (दि.१८) हाणून पाडला.
नाशिक : मोटवाणीरोडवरील शाहूनगर येथे मार्केटचे आरक्षण असताना त्याठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आली तर आहेच, शिवाय ताब्यात नसताना या इमारतीवर महापालिका वर्षानुवर्षे खर्च करीत आहे. या वादग्रस्त अभ्यासिकेसाठी आणखी ६२ लाख रुपये खर्च करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी (दि.१८) हाणून पाडला. भाजपाचेच नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांच्या प्रभागात आणि त्यांच्या संस्थेला ही अभ्यासिका देण्यात आली असून, त्याला भाजपच्याच सभापतींनी दणका दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. स्थायी समितीची साप्ताहिक बैठक सभापती उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा प्रकार घडला. मार्केटचे आरक्षण असताना त्या जागी शैक्षणिक कारणासाठी अभ्यासिका करण्यात आली आणि नंतर याच भागात शैक्षणिक प्रायोजनासाठी आरक्षित भूखंडावर मार्केट बांधण्यासाठी मूळ आरक्षणाच्या प्रयोजनात
पीटीसीसमोरील वादग्रस्त भूखंडांवरून सध्या महापालिकेत रामायण सुरू आहे. शासकीय खात्यांसाठी मुख्य प्रशासकीय इमारत बांधण्यासह विविध कारणांसाठी आरक्षण आहे. सदरच्या भूखंड नागरी जमीन कमाल धारणा कायद्याअंतर्गत महापालिकेला मोफत मिळणार असताना त्याला टीडीआर कोणी दिला, तसेच मोफत मिळणाऱ्या भूखंडावर महापालिकेचे नाव लावून घ्यावे, असे पत्र दिनकर पाटील आणि संतोष साळवे या दोन नगरसेवकांनी दिले होते. त्यावर सभापती निमसे यांनी महापालिकेचे नाव लावण्यास संमती देताना मुळातच मोफत मिळू शकणाºया या भूखंडाचा मोबदला का अदा करण्यात आला, याचा अहवाल देण्याचे आदेश सभापती निमसे यांनी मागितले असून, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.