सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ठरणार नाशिककरांना महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:09 AM2018-01-02T01:09:00+5:302018-01-02T01:12:12+5:30

Expensive to Nashik to be spit in public places | सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ठरणार नाशिककरांना महाग

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ठरणार नाशिककरांना महाग

googlenewsNext
ठळक मुद्देदर निश्चित : दंड करण्याचे अधिकार महापालिकांनारस्त्यावर घाण केल्यास १८० रुपयेउघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये

नाशिक : रस्त्यावर घाण केल्यास १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये आणि उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये, हे दरपत्रक आहे अस्वच्छता करणाºया नागरिकांसाठी. महाराष्टÑ शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत तरतुदींचे पालन न करणाºया व्यक्ती-संस्थांना जागेवरच दंड करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान केले असून, त्यासाठी दरपत्रकही निश्चित करून दिले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेकडूनही लवकरच हे दरपत्रक लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत आपल्या अधिकारात अस्वच्छता करणाºयांकडून मागील वर्षी १ लाख ९३ हजार रुपये दंड वसूल केलेला आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्टÑ अभियान राबविले जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १ मे २०१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरामध्ये ‘कचरा लाख मोलाचा’ या अंतर्गत निर्मितीच्या जागी कचºयाचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना महापालिकांना दिलेल्या आहेत. परंतु, बºयाच नागरिकांकडून घनकचºयाचे विलगीकरण केले जात नाही आणि अस्वच्छतेला कारणीभूत व्यवहार नदीपात्रातील अस्वच्छतेबाबतची कारवाई
प्रकार केसेस दंडाची रक्कम
कपडे धुणे ०७ ६,५००
वाहने धुणे ३९ ३८,५००
पुजेचे साहित्य टाकणे ०३ ३,०००
शौचास बसणे ०१ ५००
एकूण ५० ४८,०००

Web Title: Expensive to Nashik to be spit in public places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.