ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:29 AM2018-10-12T01:29:05+5:302018-10-12T01:29:26+5:30
ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अवयव मानवाला निर्माण करता येणार नाही, असे प्रतिपादन आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केले. गुरुवारी (दि.११) सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
नाशिक : ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अवयव मानवाला निर्माण करता येणार नाही, असे प्रतिपादन आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केले. गुरुवारी (दि.११) सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
दादासाहेब गायकवाड सभागृह येथे चारदिवसीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पुढे म्हणाल्या, सध्याच्या काळात ईश्वरनिर्मित वातावरण प्रचंड प्रदूषित झाले आहे. यावर सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करणाऱ्या परमेश्वराची सेवा मानवी जीवन कृतार्थ करू शकते. कोणतेही व्यसन मोठ्या प्रमाणावर घातक असल्याने त्यातून विनाश अटळ आहे. विनाशाला निमंत्रण देणाºयांनी भक्तिमार्गाचा अवलंब केल्यास व्यसनाला तिलांजली देता येईल. चिरंतन आनंद देणाºया रामनामाची उपासना प्रत्येकाला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे, अक्षय आनंद देणारी आहे असे सांगून ईश्वरसेवेसाठी प्रत्येकाने आवर्जून वेळ काढावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह पदाधिकाºयांनी आनंदमूर्ती गुरू माँ यांचे स्वागत केले.
कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.