‘मेघदूत’च्या रसास्वादाची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:57 AM2018-07-15T00:57:43+5:302018-07-15T00:58:04+5:30
नाशिक : ‘कवीकुलगुरू’ कालिदास यांनी इ.स. चौथ्या शतकाच्या सुमारास संस्कृत भाषेत रचलेल्या अभिजात काव्य मेघदूतच्या मराठी अनुवादीत रचनांचा रसास्वाद नाशिककरांनी शनिवारी (दि.१४) अनुभवला. निमित्त होते कालिदास दिनाच्या पार्श्वभमीवर शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित ‘मेघानुवाद’ स्वरवाचन सोहळ्याचे.

मेघदूत लिहिले गेल्यावर ते इतके प्रसिद्ध व लोकप्रिय झाले, की त्याकाळच्या इतर कवींनीही कालिदासांचे अनुकरण करायला सुरुवात केली आणि दूतकाव्यांची एक लाट आली. संस्कृत काव्यांचा काळ संपला पण मेघदूताची जनमाणसावरची मोहिनी संपली नाही. मेघदूतचे अनेक अनुवाद झाले त्याचसोबत मेघदूतच्या आधारे तत्सम काव्याची रचनाही मोठ्या प्रमाणात झाली, अशाच कुसुमाग्रज, शांता शेळके आदी कवी कवयित्रींनी मेघदूतच्या केलेल्या अनुवादांतीत ‘सुभग जलाशय-यांत नाहली वनवासी मैथिली, घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली’, ‘कुबेरसेवक यक्ष एक कुणी सेवेमाजीं अपुल्या चुकला, प्रियावियोगे अधिकच दु:सह वर्षाचा त्या शाप मिळाला’ आदी रचनांचे स्वरवाचन राजा पुंडलिक, गिरीश जुन्नरे, प्रा. शिशिर सिंदेकर व चिन्मय खेडेकर यांनी केले. त्यांना अनुपम जोशी यांनी संगीत सहवादनाने साथ दिली. कवी कालिदासांच्या रचनांचा मराठी अनुवाद ऐकताना रसिकही भारावून गेले.