इगतपुरी, त्र्यंबक निवडणुकीत ‘कॉप’ चा प्रायोगिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:01 PM2017-11-30T16:01:50+5:302017-11-30T16:04:41+5:30

निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे, टु वोटर अ‍ॅपद्वारे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी, आदर्श मतदान केंद्र तयार करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

Experimental use of 'coop' in Igatpuri, Trimbak elections | इगतपुरी, त्र्यंबक निवडणुकीत ‘कॉप’ चा प्रायोगिक वापर

इगतपुरी, त्र्यंबक निवडणुकीत ‘कॉप’ चा प्रायोगिक वापर

googlenewsNext
ठळक मुद्देसहारिया : निवडणुक तयारीचा आयुक्तांकडून आढावाअ‍ॅप्लिकेशनचा वापर यशस्वी झाल्यास देशपातळीवर ते वापरण्यात येणार

नाशिक : राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गुरूवारी जिल्ह्यात होऊ घातलेल्या इगतपुरी, त्र्यंबक नगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा घेऊन नगरपालिका निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी आयोगाने तयार केलेली ‘सिटीझन आॅन पेट्रोल’ (कॉप) हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून, त्याचा प्रायोगिक वापर या निवडणुकीसाठी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या अ‍ॅप्लिकेशनचा वापर यशस्वी झाल्यास देशपातळीवर ते वापरण्यात येणार असल्याचे सांगितले.
जे. एस. सहारिया यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या अ‍ॅपच्या माध्यमातून जनतेला लोकशाहीच्या दृष्टीने सक्षम करणयाचे काम करण्यात येत आहे. अ‍ॅपवर येणा-या तक्रारींची तातडीने दखल घेण्यात यावी, अ‍ॅपच्या वापराबाबत निवड केलेल्या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात यावे, नागरिकांनी न घाबरता तक्रार केली तर आदर्श निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल. निवडणुकीनंतर स्वतंत्र संस्थेमार्फत अ‍ॅपच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यात येणार आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे, टु वोटर अ‍ॅपद्वारे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी, आदर्श मतदान केंद्र तयार करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अपंगासाठी रूग्णाहिका आणि व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकाºयांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा सक्षमपणे वापर करावा.
यावेळी निवडणूक उप आयुक्त अविनाश सणस यांनी सांगितले की, ‘कॉप’च्या माध्यमातून येणाºया तक्रारींबाबत तक्रार करणाºयाची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. या अ‍ॅपचे आंतरराष्टÑीय परिषदेत ५३ राष्टÑांनी कौतुक केले असून, अ‍ॅपबाबत मातिही जाणून घेतली आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरपासून त्याचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार असून, तो यशस्वी ठरल्यास राष्टÑीय पातळीवर मार्गदर्शक ठरेल. या बैठकीत पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस यंत्रणेच्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीसाठी एक एसआरपी कंपनी आणि दोनशे होमगार्डची मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी अधिकाºयांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी असे आवाहन केले.

Web Title: Experimental use of 'coop' in Igatpuri, Trimbak elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.