विज्ञान प्रदर्शनात प्रयोगांचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:34 AM2019-10-27T00:34:08+5:302019-10-27T00:35:17+5:30
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एकूण ४३ विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले.
नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एकूण ४३ विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले.
या सर्व प्रकियेमध्ये त्यांना प्रकल्प निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते. ड्रोन, मल्टी अॅग्रीकल्चर रोबोट, स्मार्ट बीन, ड्रीप एरीगेशन, सोलर सिटी, नॉन न्यूटोनिअन फ्लुइड, हायड्रोपोनिक फार्मिंग, होलोग्राम, वाटर हार्वेस्टिंग, विंड मिल, वायरलेस पावर ट्रान्स्फर सर्किट अशा प्रतिकृती तयार करून रासबिहारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर प्रस्तूत केली. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण डॉ. गणेश दाभाडे, सचिन शिंदे यांनी केले. यावेळी शिंदे यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल व विचारांच्या प्रक्रि येबद्दलचे कौतुक केले. यात प्रदर्शनात तंत्रज्ञान आणि मूलभूत विज्ञान या दोन संकल्पनेवर निकाल जाहीर करण्यात आले. गट अ (मूलभूत विज्ञान ) प्रथम : ज्ञानेश्वरी देवरे, अनन्या अग्रवाल, तमन्ना मारवा, दिव्या वेंदे, आर्या मिश्रा, सुदीक्षा साळुंखे, आर्या कांडेकर, सोहा भावसार, सेजल सोनार, अनुष्का देवरे गट ब (तंत्रज्ञान) प्रथम : प्रांजल बोरस्ते, आदित्य इंगळे, मयूर फेगडे, अवी गुप्ता, विरु पाक्ष ढगे, शुभम गायते, स्वामी बत्तासे, रु द्र भामरे, तेजस हडस, प्रथमेश हिवाळे, आयुष कांडेकर, निकुंज पालिजा, रोशन शिलावट यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षिका श्रृती नाईक, सुवर्णा पाटील, प्रभावती प्रसाद, गौरी जोशी, राजेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीरंग सारडा, मुख्याध्यापक बिंदू विजयकुमार, मुख्याध्यापक शिल्पा अहिरे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिया गुजराती व मोक्षदा चिरमाडे यांनी केले.