बागलवाडी शिवारात मुदतबाह्य औषधे रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:21+5:302021-06-19T04:11:21+5:30
सदर ठिकाण म्हाळसाकोरे आरोग्य केंद्राअंतर्गत येत असल्याने तेथील कर्मचारी डॉ. नीचिते, डॉ.संसारे, डॉ.गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन ...
सदर ठिकाण म्हाळसाकोरे आरोग्य केंद्राअंतर्गत येत असल्याने तेथील कर्मचारी डॉ. नीचिते, डॉ.संसारे, डॉ.गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि सर्व औषधे ताब्यात घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी विजय देवरे यांच्याशी संपर्क करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना उपचारादरम्यान कॅल्शिअमच्या गोळ्या मागील महिन्यात मागूनदेखील मिळत नव्हत्या, मात्र, लाखो रुपये किमतीचे कॅल्शिअम गोळ्यांचे बॉक्स, हजारो इंजेक्शन, वेगवेगळ्या गोळ्यांचे हजारो पॅकेट हे रुग्णांना वेळेत दिले गेले नाही. त्यामुळे एक्सपायरी झालेली औषधे कुठे लपवावीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय उत्तरे द्यावी, अशा पेचात सापडलेल्यांनी सदर लाखो रुपयांची औषध कवडीमोल ठरवत फेकून दिली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. सदर औषधांचा पंचनामा करण्यात आला असून, यावेळी सरपंच भगवान चव्हाण, उपसरपंच अरिफ इनामदार, प्रकाश बागल, रघुनाथ ढोबळे, बाळासाहेब ढोबळे, रामदास खालकर, अशोक बागल, पोलीस पाटील संजय चाबुकस्वार उपस्थित होते.
कोट....
सदर प्रकार गंभीर असून गोळ्यांच्या पॉकेटवरील बॅच नंबरवरून ते कोणत्या आरोग्य केंद्रात पाठवली आहेत. याचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
डॉ. विजय देवरे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी
कोट....
सरकारी रुग्णालयात रुग्णांना उपचारादरम्यान मोजकीच औषधे दिली जातात, औषधे शिल्लक राहिली की असे रस्त्यावर फेकून देण्याचा प्रकार घडतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. लाखो रुपयांची औषधे बेवारस फेकून देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे.
सुरेश कमानकर, जि. प. सदस्य
फोटो- १८ बागलवाडी मेडिसिन
===Photopath===
180621\18nsk_50_18062021_13.jpg
===Caption===
फोटो- १८ बागलवाडी मेडिसिन