कळमदरी येथे चोर समजून जमावाकडून तरुणांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:56 PM2019-07-03T22:56:40+5:302019-07-03T22:57:07+5:30
नांदगाव : मालेगाव येथून गिरणा धरणात छंद म्हणून मच्छिमारी करण्यासाठी आलेल्या शफीक हानिफ खान व त्याच्या सहा साथीदारांना कळमदरी येथे जमावाने चोर समजून जबर मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी कळमदरी येथे चोरी झाली होती. या संदर्भात नांदगाव पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी सोबत मुकीम, नासीर, अस्सू, गुलाम, रसूल, कुबेर हे सर्व गिरणा धरणाजवळ मासेमारीला आले होते. मासेमारी केल्यानंतर ते कळमदरी येथे आले असता नागरिकांनी त्यांची विचारपूस केली; परंतु त्यांच्याशी काही एक न बोलता हे तरुण मोटारसायकलने परत गिरणा धरणाकडे गेले. धरणावरील मुख्यगेट बंद असल्याने तेथेच थांबले. यावेळी काही तरुणांनी या तरुणांना तेथे जाऊन हटकले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या तरुणांना लाथाबुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण केली गेली. त्यानंतर हे तरुण मालेगावी निघून गेले व मालेगाव येथे शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेतले व दुसऱ्या दिवशी याबाबतची तक्रार नांदगाव पोलिसात करण्यात आली. या प्रकरणी २० व्यक्तींवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसापूर्वी कळमदरी गावात चोरी झाली होती. त्यामुळे संशयाने अनोळखी तरुणांना कळमदरी गावातील नागरिकांनी विचारणा केली असता ते न बोलता तेथून निघून गेले. त्यानंतर वरील प्रकार घडला. गिरणा धरणाची सुरक्षितता बेभरवाशाची असून, येथे कोणीही येऊन मासेमारी करणे. धरणाजवळ जाऊन थांबणे किंवा बेकायदेशीर धंदे करणे आदी वाढीस लागले आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणेने लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.