ब्राह्मणगावी शेतकरी प्रशिक्षणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:15 AM2018-06-10T00:15:45+5:302018-06-10T00:15:45+5:30
ब्राम्हणगाव : येथील बाजार चौकात महादेव मंदिर परिसरात तालुकास्तरीय ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण पंधरवड्याची सांगता झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहिरे होत्या.
ब्राम्हणगाव : येथील बाजार चौकात महादेव मंदिर परिसरात तालुकास्तरीय ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण पंधरवड्याची सांगता झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहिरे होत्या.
कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी कापडणीस यांनी शासकीय योजना आता आॅनलाइन असल्याने शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक अर्ज सादर करावेत. शेतकरी शाळा चालू करणे, माती परीक्षण, खते , औषध फवारणी आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार नामपूर, कृषी अधिकारी राजपूत ,कृषी पर्यवेक्षक राजेंद्र चव्हाण, सी.बी. देवरे, कृषी सहायक आर.एफ.जाधव, आर.के. सावंत, दिनेश खैरनार आदी उपस्थित होते.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहीरे, माजी सरपंच सुभाष अहीरे, बाळासाहेब अहीरे यांनी कांदा चाळ योजनेचा आर्थिक लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अिहरे, माजी उपसरपंच गोटू पगार, अनिल खरे, ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे, अशोक शिरोडे, रिपाइंचे बापुराज खरे, बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, साहेबराव अहीरे, हेमंत अहीरे, यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.