निर्यातबंदी उठली अन‌् परदेशातील दर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:18+5:302020-12-31T04:16:18+5:30

चौकट- आयातीचे धोरण कायम निर्यातबंदी उठवितानाच केंद्र शासनाने कांदा आयातीला मुदत वाढ दिलेली आहे. देशात लागवड झालेल्या लाल ...

Export ban lifted and foreign rates fell | निर्यातबंदी उठली अन‌् परदेशातील दर कोसळले

निर्यातबंदी उठली अन‌् परदेशातील दर कोसळले

Next

चौकट-

आयातीचे धोरण कायम

निर्यातबंदी उठवितानाच केंद्र शासनाने कांदा आयातीला मुदत वाढ दिलेली आहे. देशात लागवड झालेल्या लाल कांद्याच्या उत्पादनाचा अंदाज नसल्याने जर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले, तर निर्यातबंदी होऊ शकते, असा यापूर्वीचा अनुभव पाहता, शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊनच कांदा विक्रीचा निर्णय घ्यायला हवा, असा सल्लाही दिला जात आहे.

कोट -

निर्यातबंदी उठल्यामुळे इतर देशांमधील कांदाभाव पडले आहेत. यामुळे आपल्याकडील कांदा दरात खूप मोठा फरक पडेल, असे वाटत नाही. खूप झाले, तर २०० ते ३०० रुपयांनी कांदा भाव सुधारतील. आपल्याकडील कांद्याला परदेशात स्पर्धा करावी लागणार आहे. निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय चांगला आहे. त्यामुळे देशात कोसळत असलेले कांदाभाव स्थिर राहाण्यास मदत झाली आहे.

- नितीन जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव

Web Title: Export ban lifted and foreign rates fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.