निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:38 PM2020-02-17T22:38:17+5:302020-02-18T00:24:51+5:30
शासनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानित योजना राबविल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीत प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केले.
पाटोदा : शासनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानित योजना राबविल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीत प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केले.
येवला तालुक्यातील पाटोदा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने निर्यातक्षम द्राक्ष बाग उत्पादन व किसान गप्पा गोष्टी अंतर्गत चर्चासत्र व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्याप्रसंगी बनकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरनारे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, डॉ. आंबरे आदी उपस्थित होते. भास्कर नाईकवाडी यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन क्षीरसागर यांनी आभार मानले. कृषी सहायक प्रकाश जवणे, साईनाथ कालेकर यांनी नियोजन केले.