निर्यातक्षम द्राक्षे तोडून टाकली बागेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:05 PM2020-04-04T22:05:41+5:302020-04-04T22:07:07+5:30
निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.
कोरोनामुळे निर्यातबंदी असल्याने द्राक्षबागांना कमी भाव मिळत आहे. शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने द्राक्षांची खरेदी करणे गरजेचे वाटत आहे. कारण बांधावर व्यापारी शेतकºयांकडून कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत. शेतकºयांनी स्वत:च्या कुटुंबाचा घास हिसकावून द्राक्षबागांसाठी खर्च करून द्राक्षबागा वाचविलेल्या आहेत. वाचविलेल्या बागांमधून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे. परतीच्या पावसातून वाचविलेल्या बागांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. एक एकर बागांसाठी तीन लाखांच्यावर खर्च झालेला आहे.
निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकरी प्रवीण उफाडे यांनी ३५ गुंठेमधील निर्यातक्षम असलेले सुमारे २५० क्विंटल द्राक्षांना योग्य भाव न मिळाल्याने कटिंग करून द्राक्षबागेच्या गल्ल्यांमध्ये टाकून दिलेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखांपर्यंतचा खर्च झालेला आहे. स्थानिक व्यापारी आणि निर्यात करणाºया व्यापाºयांकडून अवघा २-३ रुपये किलोने मागणी झाल्याने उफाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामध्ये याआधी एक एकर बागाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या उर्वरित ३५ गुंठेच्या बागेतून किमान खर्च तरी वसूल होईल, अशी आशा बाळगून उफाडे यांनी कुटुंबीयांसोबत मेहनत घेत निर्यातक्षम द्राक्ष तयार केली होती. शेतकºयांचा अपेक्षाभंगद्राक्षबागेकडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु कोरोनामुळे ती धुळीस मिळाळी आहे. यावर्षी या बागांवर झालेला खर्चही न मिळाल्याने कुटुंब कर्जाच्या खायीत गेलेले आहे. व्यापाºयांकडून कवडीमोलाने निर्याक्षम द्राक्षांची मागणी झाल्याने हतबल झालेल्या उफाडे यांनी सदरचा माल हा तोडून जमिनीवरच
अंथरूण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना या द्राक्षांपासून मनुका तयार करण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखापर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच द्राक्षांची पूर्णत: साखर रिटर्न झालेली आहे. त्यामुळे हे द्राक्ष उन्हाने वाळवूूनही विक्र ी लायक असा मनुका तयार होणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडून अशा मनुका खरेदी होणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे द्राक्ष तोडून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे उफाडे यांनी सांगितले. शेतीमाल विक्रीसाठी शासन स्तरावर योग्य धोरण ठरविणे गरजेचे आहे. माझा पहिला एक एकर बाग परतीच्या पावसात सापडल्याने पूर्णत: नष्ट झालेला आहे. त्यामुळे आम्ही उर्वरित नवीन पाच वर्षाचा सुमारे ३५ गुंठे जमिनीवरील बागेसाठी जीवतोड मेहनत घेतली. कुटुंबीयांच्या तोंडाला घास कमी करून या बागेसाठी औषधे, मशागतीसाठी खर्च केला. परंतु दोन ते तीन रु पये किलोने द्राक्षाची मागणी झाल्याने आमची भ्रमनिराशा झालेली आहे.
-प्रवीण उफाडे, महादेवनगर