सोनजांबला निर्यातक्षम द्राक्षबाग कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:41 AM2018-02-26T00:41:58+5:302018-02-26T00:41:58+5:30

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील संदीप एकनाथ गायकवाड यांची दीड एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग रविवारी पहाटे जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.

Exported grape to Sonjamb falls | सोनजांबला निर्यातक्षम द्राक्षबाग कोसळली

सोनजांबला निर्यातक्षम द्राक्षबाग कोसळली

googlenewsNext

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील संदीप एकनाथ गायकवाड यांची दीड एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग रविवारी पहाटे जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. गायकवाड कुटुंब झोपेत असताना मध्यरात्री १ वाजता अचानक तार तुटून सर्व बाग जमीनदोस्त झाली. बाग घराच्या जवळच असल्याने आवाज येताच गायकवाड कुटुंबाला जाग आली.  काय झाले हे पाहण्यासाठी गायकवाड घराबाहेर आल्यानंतर बाग पडल्याचे लक्षात आले. एक्स्पोर्ट कंपनीला सॅम्पल काढून दोन डिटेक्शन आले होते. काही दिवसातच द्राक्ष परदेशवारी करणार आणि त्यातून मिळणाºया पैशांतून उसणवारी, खते औषधे, बँकेच्या कर्जाची परतफेड केली जाणार होती; परंतु बाग पडल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. गायकवाड यांनी प्रशासनानला घटनेची माहिती दिली. तलाठी  व कृषी अधिकाºयांनी धाव घेत पंचनामा करून अहवाल शासनदरबारी पाठवला आहे. सोनजांब परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनातून शासनाला लाखो रु पये कर मिळतो; परंतु उत्पादकांवर नैसर्गिक संकट आल्यावर पंचनामा करून त्वरित मदत केली जात नाही. दोन वर्षे झाली तरी मला नुकसानभरपाई मिळाली नाही. पंचनामे करून शेतकºयांची दिशाभूल केली जात आहे. गायकवाड यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी.  - प्रभाकर जाधव, शेतकरी

Web Title: Exported grape to Sonjamb falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी