सहा महिन्यांत द्राक्षांची  सव्वा लाख मेट्रिक टन निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 01:35 AM2021-04-12T01:35:06+5:302021-04-12T01:36:33+5:30

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत  केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Exports of one and a half lakh metric tonnes of grapes in six months | सहा महिन्यांत द्राक्षांची  सव्वा लाख मेट्रिक टन निर्यात

सहा महिन्यांत द्राक्षांची  सव्वा लाख मेट्रिक टन निर्यात

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे मोठ्या प्रमाणात फटका; द्राक्ष उत्पादक चिंतित

नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत  केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
जिल्ह्यात साधारणत सप्टेंबरपासून अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू होत असतो. बहुतेक अर्ली द्राक्षांची परदेशात निर्यात होत असते. मागील वर्षापासून असलेल्या कोरोना संकटामुळे  द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. युरोपातून होणारी मागणी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारात आणला. मात्र,  स्थानिक बाजारातही द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारपेठेत विकण्याचा निर्णय घेतला. स्थानिक बाजारपेठेतही फारसी मागणी नसल्याने द्राक्षांचे दर घसरले आहेत. यामुळे उत्पादकांची आर्थिक ओढाताण वाढली असून, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. योग्य दर न मिळाल्याने अनेकांना खत-औषधांची उधारी भागविणेही कठीण झाले आहे. शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अल्प शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ
द्राक्षांचा हंगाम संपत आला असताना मागील आठवडाभरापासून द्राक्षांच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असून किमान दहा ते वीस रुपयांनी दर वाढले आहेत.  मात्र, आता द्राक्ष काढणी अखेरच्या टप्यात आली आहे. साधारणत: एप्रिलअखेरपर्यंत हंगाम संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहे तो माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा असली तरी  वाढीव दराचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
युरोप, आखाती देशातून मागणी कमी
n यावर्षी नोव्हेंबर २०२० ते ५ एप्रिलपर्यंत केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन इतकीच द्राक्ष निर्यात झाली आहे. युरोपियन देशांमध्ये ९०,३११, तर नॉनयुरोपीयन देशांमध्ये २७,५८० मेट्रिक 
टन इतकी द्राक्ष निर्यात 
झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक युरोपीयन देशांमधील काही प्रांतांमध्ये अद्याप लॉकडाऊन सुरू 
आहे. आखाती देशांमध्येही कोरोनामुळे द्राक्षांना 
मागणी नाही.

Web Title: Exports of one and a half lakh metric tonnes of grapes in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.