आत्महत्येचा बनाव उघड; ‘त्या’ विवाहितेचा खून विहितगाव येथील घटना : सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:34 AM2018-01-06T01:34:15+5:302018-01-06T01:34:49+5:30

नाशिकरोड : विहितगाव येथील विवाहितेने आत्महत्या नव्हे तर तिचा खून झाल्याचा प्रकार न्यायवैद्यक तपासणीत उघड झाला आहे.

Expose suicide; 'That' Marriage of Vithhagaan Event | आत्महत्येचा बनाव उघड; ‘त्या’ विवाहितेचा खून विहितगाव येथील घटना : सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

आत्महत्येचा बनाव उघड; ‘त्या’ विवाहितेचा खून विहितगाव येथील घटना : सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी गुन्हा दाखल गळा आवळून तोंड दाबून खून केला

नाशिकरोड : विहितगाव येथील विवाहितेने आत्महत्या नव्हे तर तिचा खून झाल्याचा प्रकार न्यायवैद्यक तपासणीत उघड झाला आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास केला असता चारित्र्याचा संशय घेऊन पती व नातेवाइकांनी गळा आवळून खून केल्याची बाब समोर आल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विहितगाव हांडोरे मळा येथील विवाहिता साक्षी उल्हास हांडोरे (वय ३४) हिने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मयत साक्षी हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले होते. याप्रकरणी साक्षी हिचा भाऊ सुनील बळवंत कौठे, रा. नरहरीनगर दसक जेलरोड याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, साक्षी हिचा २००६ मध्ये उल्हास हांडोरे यांच्याशी विवाह झाला असून, त्यांना दोन मुले आहेत. साक्षी अशोका स्कूलमध्ये सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत होती. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपूर्वी पती उल्हास हांडोरे व त्याच्या नातेवाइकांनी मिळून साक्षी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून तोंड दाबून खून केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित उल्हास यास शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
न्यायवैद्यक विशेषज्ञांमुळे खुनाची उकल
पत्नी साक्षी हांडोरे हिने गळफास घेतल्याचा बनाव तिचा पती उल्हास याने केला होता़ मात्र, जिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यक विशेषज्ञ डॉ़ आनंद पवार व डॉ़ धूम यांना शवविच्छेदन करताना विवाहितेची आत्महत्या नसून खून केल्याचे आढळून आल्याने त्यांनी शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण नमूद करून पोलिसांना माहिती दिली़ यानंतर पोलिसांनी उपनगर पोलीस ठाण्यात पती व नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला़

Web Title: Expose suicide; 'That' Marriage of Vithhagaan Event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून