पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:09+5:302021-06-24T04:12:09+5:30
सिडको, पवननगर येथील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहावरील सुरक्षा रक्षकाच्या बंद खोलीत दोन हजारांच्या खोट्या नोटा, दोन जिवंत कोबड्यांसह जादूटोण्यासाठी वापरण्यात ...
सिडको, पवननगर येथील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहावरील सुरक्षा रक्षकाच्या बंद खोलीत दोन हजारांच्या खोट्या नोटा, दोन जिवंत कोबड्यांसह जादूटोण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पवननगर क्रीडांगणलगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या वरच्या मजल्यावर सुरक्षा रक्षकांसाठी बांधण्यात आलेल्या खोलीत या भोंदूबाबाने आश्रय घेत आपले ‘दुकान’ थाटले होते. या खोलीत काही दिवसांपासून एक इसम राहात होता. तो या ठिकाणी जादूटोण्याचे प्रयोग करीत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्याच्या या प्रकाराची वाच्यता झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकण्याच्या दोन दिवसांपूर्वीच त्याने येथून पलायन केले होते. पोलिसांनी बुधवारी (दि.२३) टाकलेल्या छाप्यात तो राहात असलेल्या या खोलीत दोन हजारांच्या बनावट नोटा, दोन जिवंत कोंबड्या, अंडी, पूजेचे साहित्य, शंख, नाणी, काही वनस्पती, रुद्राक्षाच्या माळा यासारख्या जादूटोणाकरिता वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू पोलिसांना सापडल्या.
--इन्फो--
भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे आव्हान
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवून नागरिकांची फसवणूक करत अंधश्रध्दा पसरविणाऱ्या अज्ञात भोंदूबाबाविरुध्द अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फरार भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे आव्हान अंबड पोलिसांपुढे उभे राहिले आहे. या भोंदूबाबाने जादूटोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून कोणाची आर्थिक फसवणूक केली आहे का, याचाही शाेध पोलिसांकडून घेतला जात आहे.
===Photopath===
230621\23nsk_32_23062021_13.jpg
===Caption===
पैशांचा पाऊस