रिक्षा, टॅक्सी चालकांच्या पासिंगला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:12+5:302021-06-25T04:12:12+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे दीड-दोन वर्षांपासून रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी आदी वाहन व्यावसायिकांना ...
विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे दीड-दोन वर्षांपासून रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी आदी वाहन व्यावसायिकांना फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगारही गेला असून उपासमारीची वेळ आली. या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ते कर्जबाजारी झाले असून व्यवसाय बंद असल्याने बॅंकांचे कर्जाचे हप्तेही थकलेले आहेत. यातून सावरण्यासाठी त्यांना मोठा कालावधी लागणार आहे. कोरोना संसर्गापूर्वी ज्या व्यावसायिकांनी त्यांची वाहने एक-दोन वर्षासाठी आरटीओ कार्यालयातून पासिंग करुन मुदतवाढ केली होती, त्या काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद होता. तो कालावधी वाया गेला आहे. पासिंगसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. त्यामुळे पासिंगची मुदत दोन वर्षांनी वाढवून या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी काकडे यांनी निवेदनात केली आहे.