द्राक्ष निर्यातीसाठी बागा नोंदणीच्या मुदतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:03 AM2020-01-24T00:03:53+5:302020-01-24T00:53:09+5:30
जिल्ह्णातून युरोपियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी द्राक्षबागांची नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत बागांची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी दिली.
नाशिक : जिल्ह्णातून युरोपियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी द्राक्षबागांची नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत बागांची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी दिली.
निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीसाठी १४ आॅक्टोबर २०१९ पासून ग्रेपनेट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी प्रपत्र-१ मध्ये अर्ज, अर्जासोबत सातबारा उताºयाची प्रत व बागेचा नकाशा यांसह ५० रुपये फी भरणे आवश्यक आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी कमालीची घट झाली असून, आतापर्यंत युरोपियन देशांमध्ये १ हजार ११४ मेट्रिक टन तर नॉन युरोपियन देशांमध्ये ४ हजार २२७ मेट्रिक टन द्राक्षांच्या निर्यात झाली आहे. सन २०१८-१९ च्या हंगामात जिल्ह्णातून एक लाख ४६ हजार ११३ मेट्रिक टन द्राक्षनिर्यात झाली होती. जिल्ह्णामध्ये साधारणत: १४.५९ लाख मेट्रिक टन द्राक्षांचे उत्पादन होते, तर प्रती हेक्टरी २५ मेट्रिक टनापर्यंत उत्पादन होत असल्याची माहिती त्यांनी दिली.