भरदिवसा घरातील वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:55 PM2019-11-03T22:55:45+5:302019-11-03T22:57:44+5:30

देवळा : देवळा शहरात दिवसाढवळ्या घरात घुसून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरु न नेल्याची घटना घडली असुन या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Extends the golden texture of the nostalgia throughout the day | भरदिवसा घरातील वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत लांबविली

भरदिवसा घरातील वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत लांबविली

Next
ठळक मुद्देशहराची सुरक्षितता वाऱ्यावर

देवळा : देवळा शहरात दिवसाढवळ्या घरात घुसून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरु न नेल्याची घटना घडली असुन या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहर सुरिक्षततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सीसीटिव्हि यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रविवारी (दि.३) शहरातील वाणी गल्लीतील विमल विश्वनाथ मेतकर ह्या वृध्द महीला आपल्या घरात बसलेल्या असतांना दुपारी बारा वाजेच्या सुमारास चोरट्याने आत येऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्याची सोन्याची पोत खेचून पोबारा केला.
अशीच घटना महानाभरापूर्वी प्रसिध्द कांदा व्यापारी व देमकोचे माजी अध्यक्ष भालचंद्र कोठावदे यांच्या विद्यानगर भागातील निवासस्थानी घडली होती. दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम पावडर विकण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी आले. स्नूषा रत्ना सुधाकर कोठावदे यांना भांडे घासण्याची पावडर दाखवत भांड्यांबरोबर दागिनेही कसे चमकतात हे त्या व्यक्तींनी प्रात्यक्षिक करून दाखवले. यामुळे प्रभावित झालेल्या श्रीमती कोठावदे यांना बोलण्यात गुंगवून, त्यांना फसवून त्यांच्या हातातील बांगड्या व गळ्यातील सोन्याची माळ असे एकून बारा तोळे सोने लांबवले होते.

Web Title: Extends the golden texture of the nostalgia throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.