लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:49 IST2021-05-11T22:46:15+5:302021-05-12T00:49:21+5:30
लासलगाव : शासनाचे यापूर्वीच्या आदेशाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली आहे.

लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ
ठळक मुद्देलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली माहिती
लासलगाव : शासनाचे यापूर्वीच्या आदेशाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली आहे. अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. कोरोनामुळे निवडणूक होणार असलेल्या व मुदत संपलेल्या बाजार समिती पदाधिकारी यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. मात्र मुदतवाढ मिळालेले पदाधिकारी यांना धोरणात्मक निर्णयाचा अधिकार असणार नाही. हे स्पष्ट असून लासलगाव बाजार समितीची मुदत सोमवारला (दि.१० मे) संपली आहे.