अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यास मुदत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:42+5:302021-04-10T04:14:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अति विलंब शुल्कासह ११ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर २०२० पासून ते दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत निश्चित करण्यात आला होता. या वाढ करण्यात आली असून, दहावी व बारावीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याची अंतिम तारीख ११ एप्रिलपर्यंत असल्याचे विभागीय मंडळाने स्पष्ट केेले असून, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाइटचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. माध्यमिक शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी रुपये २० प्रतिदिन स्वीकारून विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज सादर करण्यासाठी विभागीय मंडळाने शुक्रवारपासून (दि.९) रविवार (दि.११) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असून, कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, विभागीय मंडळांनी अर्ज स्वीकारताना त्यावर सुपर लेट फॉर्म शेरा पाहूनच अर्ज स्वीकारावेत, तसेच प्राप्त सर्व फॉर्म १७ची तपासणी दि. १६ एप्रिलपर्यंत पूर्ण करावी व त्यातील पात्र/अपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून राज्य मंडळाकडे सादर करण्याच्या सूचना राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी केली आहे.