कांदा अनुदानासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:29 AM2019-04-10T00:29:04+5:302019-04-10T00:29:25+5:30
सिन्नर : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली. यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात आॅक्टोबर २०१८नंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समित्या व खासगी बाजार समित्यांमध्ये १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिक्विंटल व प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यासाठी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकºयांना कांदा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ मार्च २०१९ पर्यंत अनुदान मागणीचे अर्ज त्यांनी कांदा विक्री केलेल्या बाजार समितीत जमा करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकºयांना अडचणींना तोंड द्यावे लागले. दि. १ नोव्हेंबर २०१८ ते दि. २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत सिन्नर बाजार समिती, नांदूरशिंगोटे, दोडी व नायगाव या उपबाजारात विक्री केलेल्या कांदा शेतमालाचे अनुदान अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकºयांनी आपले अर्ज विहित मुदतीत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात व उपबाजारात आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करावेत, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.