जिल्ह्यात शिल्लक मका खरेदीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 02:13 AM2019-01-05T02:13:43+5:302019-01-05T02:13:59+5:30

जिल्ह्यात डिसेंबरअखेर हमीभावाने २२३७३ क्ंिवटल मक्याची खरेदी झाली असून, नोंदणी केलेल्या मक्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक मका शेतकºयाच्या खळ्यावर पडून आहे. शेतकºयांचा रोष टाळण्यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्णातील साडेचार हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे.

Extension for the purchase of remaining Maize in the district | जिल्ह्यात शिल्लक मका खरेदीसाठी मुदतवाढ

जिल्ह्यात शिल्लक मका खरेदीसाठी मुदतवाढ

Next
ठळक मुद्दे२२ हजार क्ंिवटल खरेदी : शेतकऱ्यांकडे मका पडून

नाशिक : जिल्ह्यात डिसेंबरअखेर हमीभावाने २२३७३ क्ंिवटल मक्याची खरेदी झाली असून, नोंदणी केलेल्या मक्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक मका शेतकºयाच्या खळ्यावर पडून आहे. शेतकºयांचा रोष टाळण्यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्णातील साडेचार हजार शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे.
गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्यामुळे मक्याच्या उत्पादनात घट झाली असली तरी, यंदा नोव्हेंबर पासून शेतकºयांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुसºया आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. (पान ७ वर)
खुल्या बाजारात १५०० ते १६०० रुपये क्विंटलमागे दर देण्यात येत असताना शासनाने हमीभावाने १७०० रुपये क्विंटल दर निश्चित केल्याने साहजिकच शेतकºयांचा कल खरेदी केंद्राकडे वाढला. तथापि, डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात खुल्या बाजारात मक्याचे दर १८५० पर्यंत गेल्याने शेतकºयांनी पुन्हा व्यापाºयांकडे धाव घेतली. त्यामुळे खरेदी केंद्रे जवळपास पंधरा दिवस ओस पडले. जेमतेम ७०६ शेतकºयांचा २२३७३ क्विंटल मक्याची खरेदी या काळात होऊ शकली. मात्र खुल्या बाजारातील मक्याचे दर पुन्हा आवक वाढल्याने कोसळले व ते दीडशे रुपयांची कमी झाल्याने शेतकºयांनी खरेदी केंद्रांवर गर्दी केली. परंतु शासनाने हमीभावाने मक्याच्या खरेदीसाठी ३१ डिसेंबरअखेरची मुदत असल्याने मका खरेदी थांबविण्यात आली. मात्र आॅनलाइन नोंदणी केलेल्या एकूण शेतकºयांपैकी दहा टक्केच शेतकºयांच्या मक्याची खरेदी महिनाभरात होू शकल्याने उर्वरित साडेचार हजार शेतकºयांकडे मका पडून असल्याने त्याबाबतचा अहवाल मार्केट फेडरेशनने शासनाला दिला होता. त्याची दखल घेऊन शासनाने १५ जानेवारीपर्यंत मका खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्णातील दहाही केंद्रांवर खरेदी सुरू राहील, असे जिल्हा मार्केट फेडरेशनचे पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
जिल्ह्णात ३१ डिसेंबरअखेर ५,४९२ शेतकºयांनी नोंदणी केली होती. त्यासाठी दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. यंदा उशिरा पावसाचे आगमन झाल्यामुळे मक्याची काढणीही लांबणीवर पडली. परिणामी बहुतांशी शेतकºयांनी दिवाळीनंतर मका काढणीला घेतला. याच काळात खुल्या बाजारातही व्यापाºयांनी मका खरेदीला सुरुवात केली होती.

Web Title: Extension for the purchase of remaining Maize in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.