मुक्त विद्यालयाच्या अर्जासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:44+5:302021-01-04T04:12:44+5:30

नाशिक : मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने मुदतवाढ दिली असून, याअंतर्गत पाचवी ...

Extension till 31st January for open school application | मुक्त विद्यालयाच्या अर्जासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुक्त विद्यालयाच्या अर्जासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Next

नाशिक : मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने मुदतवाढ दिली असून, याअंतर्गत पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करता येणार आहे. यापूर्वी नावनोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता महिनाभराच्या कालावधीने वाढविण्यात आली आहे.

दिव्यांग किंवा शाळेत न जाता विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा देता यावी, यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाच्या धर्तीवर राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ दोन वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. या मंडळांतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवी, तेरा वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी आठवी आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊ शकणार आहे. चौदा वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्रांचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येत असून त्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर २ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्र नमूद केलेल्या केंद्रात जमा करण्याची संधी मिळणार आहे. केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क व कागदपत्र विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Web Title: Extension till 31st January for open school application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.