निवडणूक आयोगाकडून मतदार डाटा एंट्रीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:08 AM2018-11-28T01:08:14+5:302018-11-28T01:08:31+5:30

निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात सप्टेंबर ते आॅक्टोबरअखेर राबविलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविलेल्या मतदारांची आयोगाच्या वेबसाइटवर आॅनलाइन नावनोंदणीचे काम राज्यात युद्धपातळीवर सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने कामकाज ठप्प झाले.

Extension of voter data entry by Election Commission | निवडणूक आयोगाकडून मतदार डाटा एंट्रीला मुदतवाढ

निवडणूक आयोगाकडून मतदार डाटा एंट्रीला मुदतवाढ

Next

नाशिक : निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात सप्टेंबर ते आॅक्टोबरअखेर राबविलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविलेल्या मतदारांची आयोगाच्या वेबसाइटवर आॅनलाइन नावनोंदणीचे काम राज्यात युद्धपातळीवर सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने कामकाज ठप्प झाले. परिणामी मुदतीत डाटा एंट्री होणे शक्य नसल्याचे पाहून निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीला यंदा अधिक महत्त्व असून, सप्टेंबर ते आॅक्टोबर अखेर संपूर्ण देशात राबविलेल्या या मोहिमेला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी करण्यात आल्यामुळे येत्या निवडणुकीत मतदारांची संख्या कमालीची वाढलेली असेल. मतदारांची छायाचित्रासह अद्ययावत यादी जानेवारी महिन्यात आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येईल. तत्पूर्वी ज्यांनी नव्याने नाव नोंदविले अशांची नोंद आयोगाच्या वेबसाईटवर करणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यात डाटा एंट्री आॅपरेटरकडून मतदारांच्या अर्जांची छाननी होऊन त्याच्या नावाची नोंद झाली असली तरी, त्यानंतर तीन टप्प्यात अधिकाºयांकडून प्रत्येक मतदाराच्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. अंतिम टप्प्यात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाºयांमार्फत मतदारांची नावे आयोगाला पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतरच आयोगाच्या मतदार यादीत त्यांची नावे समाविष्ट केली जातील. परंतु सध्या दुसºया व तिसºया टप्प्याचे काम सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यातील कामकाज ठप्प झाले. तीन दिवसांत होणारे कामकाज साहजिकच लांबणीवर पडले आहे.
ओळखपत्रही तयार करणार
राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांची ५० टक्के कामे अपूर्ण असून, आयोगाने नोव्हेंबरअखेर डाटा एंट्रीचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. सद्यस्थिती पाहता, येत्या दोन दिवसांत अपूर्ण काम पूर्ण करणे शक्य नसल्याने आयोगाकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत वाढवून दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे नव मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्याबरोबरच अशा मतदारांचे निवडणूक ओळखपत्रही तयार केले जाणार आहे.

Web Title: Extension of voter data entry by Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.