कोरोना संकटातून वाचण्यासाठी व्यापक लसीकरण आ‌वश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:57+5:302021-04-26T04:12:57+5:30

नाशिक : कोरोनाची झळ साऱ्या जगभर पसरली असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज असल्याचा सूर महाराष्ट्र आद्ग्य ...

Extensive vaccination is needed to survive the corona crisis | कोरोना संकटातून वाचण्यासाठी व्यापक लसीकरण आ‌वश्यक

कोरोना संकटातून वाचण्यासाठी व्यापक लसीकरण आ‌वश्यक

Next

नाशिक : कोरोनाची झळ साऱ्या जगभर पसरली असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज असल्याचा सूर महाराष्ट्र आद्ग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत उमटला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-१९ आजारासंदर्भात लसीकरणासाठी जनजागृती विषयावर ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अश्विनकुमार तुपकरी, ओरिजिन फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने आदी मान्यवरांनी मार्गदर्शन या कार्यशाळेत ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संदीप कुलकणी व अधिकारी वर्ग ऑनलाइन उपस्थित होते. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, समाजसेवा ही निरपेक्षपणे केली पाहिजे. कोविड-१९ पेक्षाही अनेक भयंकर आजार कदाचित भविष्यात येतील, मात्र खंबीरपणे त्याचा सामना करावा लागणार असून, कोविड-१९चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे व हात वारंवार धुणे या गोष्टींकडे कायम लक्ष द्यावे. कोविड संदर्भात देण्यात येणारी लस प्रभावी असून, ती प्रत्येकाने घ्यावी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी समाजजागृती करावी आपले आरोग्य सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित राहील. यासाठी वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक भान जागृत ठेवून जगावे. कोविडकरिता कार्य करणारे डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती व समाजसेवकांचे कार्य महान आहे. सुदृढ आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने खंबीरपणे प्रयत्न करण्याची गरज या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध वक्त्यांनी व्यक्त केली. प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

===Photopath===

250421\25nsk_14_25042021_13.jpg

===Caption===

डॉ. प्रकाश आमटे यांचे मार्गदर्शन 

Web Title: Extensive vaccination is needed to survive the corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.