सटाणा आगाराकडून विद्यार्थ्यांना जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:06 AM2018-08-03T00:06:07+5:302018-08-03T00:07:45+5:30

देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. बुधवार, दि. १ आॅगस्टपासून सटाणा आगाराने विद्यार्थ्यांसाठी जादा बससेवा सुरू केली. यामुळे पिंपळगाव (वा.) येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून, या जादा बसचे पूजन करून वाहक व चालकाचे स्वागत करण्यात आले.

Extra buses to students from Satana Agra | सटाणा आगाराकडून विद्यार्थ्यांना जादा बस

सटाणा आगाराकडून विद्यार्थ्यांना जादा बस

Next
ठळक मुद्देपिंपळगाव (वा.) : गैरसोय दूर झाल्याने समाधान; मंडळाकडून तातडीने दखल

देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. बुधवार, दि. १ आॅगस्टपासून सटाणा आगाराने विद्यार्थ्यांसाठी जादा बससेवा सुरू केली. यामुळे पिंपळगाव (वा.) येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून, या जादा बसचे पूजन करून वाहक व चालकाचे स्वागत करण्यात आले.
देवळा येथे शिक्षणासाठी येणाऱ्या पिंपळगाव (वा.) येथील ७० ते ८० विद्यार्थ्यांना सकाळी शालेय वेळेत येणाºया सटाणा आगाराच्या बसमध्ये जागा मिळत नसल्याने पैसे खर्च करून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक व शैक्षणिक नुकसानीबरोबरच मनस्ताप सहन करावा लागत होता. यामुळे विद्यार्थीवर्ग त्रासून गेला होता. विद्यार्थ्यांच्या अभिनव आंदोलनाला यश विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराकडे वेळोवेळी जादा बसची मागणी केली होती; परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी सोमवारी व मंगळवारी अभिनव पद्धतीने गाडीच्या टपावर ठिय्या आंदोलन केले होते.
अखेर सटाणा आगाराने आंदोलनाची दखल घेत सकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांसाठी जादा बस पाठविल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच नदीश थोरात यांच्या हस्ते चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Extra buses to students from Satana Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.