परिचर पदोन्नतीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:14 AM2018-04-05T01:14:54+5:302018-04-05T01:14:54+5:30
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर (शिपाई) पदोन्नतीच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने परिचरांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १७ रोजी पदोन्नतीची निवड यादी जाहीर केली जाणार असून, परिचर कर्मचाºयांचे यादीकडे लक्ष लागून आहे.
नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर (शिपाई) पदोन्नतीच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने परिचरांच्या प दोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १७ रोजी पदोन्नतीची निवड यादी जाहीर केली जाणार असून, परिचर कर्मचाºयांचे यादीकडे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांवर कार्यरत असलेल्या परिचर कर्मचाºयांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. पदोन्नती मिळावी यासाठी परिचर कर्मचाºयांकडून सातत्याने विचारणा केली जात होती तर सदस्यांनीदेखील अनेकदा प्रशासनाला याप्रकरणी विचारणा केली होती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर आणि दीपककुमार मीणा यांच्या कार्यकाळात पदोन्नतीची फाईल पडून होती. त्यामुळे परिचरांच्या पदोन्नतीचा प्रश्न रेंगाळला होता. याप्रकरणी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिचर पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत विचारणा केली होती. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर पदोन्नतीचा प्रश्न अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मार्गी लावला असून, पदोन्नतीच्या फाईलवर स्वाक्षरी करून त्यांनी सदर फाईल प्रशासन विभागाकडे पाठविली असल्याचे समजते. परिचरांची सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन तयार करण्यात येणारी यादी येत्या १७ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे परिचर कर्मचाºयांचे या यादीकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर आणि मुख्यालयातदेखील अनेक परिचर पदोन्नतीस पात्र असल्याने या कर्मचाºयांना आता कनिष्ठ लिपिकपदी बढती मिळणार आहे.
पंधरा परिचर समाधानी
जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असलेल्या परिचर कर्मचाºयांना एकीकडे पदोन्नतीची अपेक्षा असताना आणि यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत असताना ८६ पैकी सुमारे १५ परिचर असे आहेत की ते आहे त्याच ठिकाणी समाधानी आहेत. त्यांनी पदोन्नतीच्या स्पर्धेत नसल्याचे आणि आपण परिचर म्हणूनच काम करण्यास इच्छुक असल्याचे पत्र प्रशासनाला यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे या पदोन्नतीच्या यादीत या पंधरा कर्मचाºयांचा समावेश नाही. दरम्यान, या पंधरापैकी काही कर्मचाºयांनी आपले अर्ज मागे घेतले असल्याचे समजते.
पदस्थापना कशी करणार?
पदोन्नती मिळाल्यानंतर पदस्थापना कशी करणार, असा प्रश्न आता परिचर कर्मचाºयांपुढे उभा आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी परिचर कर्मचाºयांकडून रिक्त पदानुसार परिचरांकडून प्राधान्यक्रम अर्ज भरून घेतले होते. कर्मचाºयांनी पसंतीक्रमांकानुसार तीन आॅप्शन भरून दिले आहेत. या पद्धतीनेच पदस्थापना करणार की आॅनलाइन पद्धतीने पदोन्नती केली जाईल याबाबत मात्र परिचर कर्मचाºयांमध्ये संभ्रमावस्था आहे.