वातावरणात कमालीचा बदल ; शीतलहरीने गारठले नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:25 AM2019-01-30T01:25:53+5:302019-01-30T01:26:10+5:30

शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून, मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेट ७ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

 Extreme changes in the environment; Sheetalharane Garatheale Nashikkar | वातावरणात कमालीचा बदल ; शीतलहरीने गारठले नाशिककर

वातावरणात कमालीचा बदल ; शीतलहरीने गारठले नाशिककर

Next

नाशिक : शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून, मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेट ७ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. काश्मीरच्या द्रास भागात उणे तिशीपार तापमान गेल्याने बर्फ गोठला आहे. मोठ्या प्रमाणात हिमालय व काश्मीरमध्ये हिमवृष्टी होत असल्याने शीतलहर कायम आहे. परिणामी उत्तर महाराष्टÑात वातावरण अधिकाधिक थंड झाले आहे. २०१८च्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये अधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. २५ जानेवारी २०१८ रोजी ७.२ इतके सर्वाधिक कमी किमान तापमान नोंदविले गेले होते. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ आणि २०१६ साली जानेवारीअखेर सर्वात कमी ५.५ अंशांपर्यंत पारा घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. चालू वर्षी नव्या वर्षाचा पहिला दिवस थंडीने चांगलाच गाजविला. यादिवशी सर्वाधिक कमी ६.२ इतके किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभरानंतर पुन्हा पारा ६.९ अंशांपर्यंत खाली घसरला. यावर्षी थंडीचा कडाका अधिक असून, नाशिककर वाढत्या थंडीने हैराण झाले आहेत.


शीतलहरीने गारठले नाशिककर
(पान १ वरून)
कारण डिसेंबर महिन्यात ५.२ अंशांपर्यंत तापमान घसरले होते. त्यामुळे नागरिक गारठले होते. जानेवारीच्या पंधरवड्यानंतर थंडीची लाट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; मात्र मकरसंक्रांतीनंतरदेखील थंडीची लाट कायम टिकून आहे. सूर्याचे उत्तरायण सुरू असूनदेखील वातावरणात अद्याप उष्मा जाणवत नसल्यामुळे प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. मागील आठवडाभरापासून नाशिककर थंडीच्या तीव्रतेचा सामना करत आहे. उबदार कपड्यांच्या वापरावर भर देत कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करताना दिसून येत आहे.
राज्यात या शहरांमध्ये नीचांकी तापमान
नागपूर - ६.५
मालेगाव - ६.८
अकोला - ६.८
नाशिक - ७.०
अहमदनगर - ७.२
गोंदिया - ७.२
जळगाव - ७.४
बुलढाणा - ७.६
परभणी - ८.२
पुणे - ८.७
अमरावती - ९.४
चंद्रपूर - ९.४
बीड - ९.६
ताशी सहा ते सात किमी वाºयाचा वेग
शहरात वाहणाºया थंड वाºयाचा वेग सरासरी ताशी सहा ते सात किलोमीटर इतका हवामान खात्याने नोंदविला आहे. वारे वेगाने वाहू लागल्यामुळे किमान व कमाल तापमानात सातत्याने घसरण होत आहे. येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Web Title:  Extreme changes in the environment; Sheetalharane Garatheale Nashikkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.