द्राक्ष निर्यातीत कमालीची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:18 PM2020-01-10T23:18:38+5:302020-01-11T01:21:14+5:30
अवकाळी पाऊस व सतत बदलणाऱ्या लहरी हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत कमालीची घट झाली ाहे. द्राक्षपंढरी म्हणून अवघ्या देशात नाशिक जिल्ह्याचे नाव अव्वल आहे. जगाच्या बाजारपेठेत निर्यातक्षम द्राक्षांमध्येदेखील नाशिकचा दबदबा कायमच राहत आलेला आहे. परंतु यंदाच्या वर्षी निसर्गाने केलेली दगाबाजी मोठ्या प्रमाणात बागायतदारांना त्यांच्या उत्पन्नात घट निर्माण करून जाते की काय, अशी चिन्हे दिसत आहे.
सुदर्शन सारडा ।
ओझर : अवकाळी पाऊस व सतत बदलणाऱ्या लहरी हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत कमालीची घट झाली ाहे.
द्राक्षपंढरी म्हणून अवघ्या देशात नाशिक जिल्ह्याचे नाव अव्वल आहे. जगाच्या बाजारपेठेत निर्यातक्षम द्राक्षांमध्येदेखील नाशिकचा दबदबा कायमच राहत आलेला आहे. परंतु यंदाच्या वर्षी निसर्गाने केलेली दगाबाजी मोठ्या प्रमाणात बागायतदारांना त्यांच्या उत्पन्नात घट निर्माण करून जाते की काय, अशी चिन्हे दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निर्यातीचा विचार केल्यास यंदा निम्मे कंटेनरदेखील निर्यात झालेले नसल्याचे समोर आले आहे. याला मुख्य कारण म्हणजे दररोज बदलणारे वातावरण, हिवाळ्याच्या प्रारंभी पडलेला अवकाळी पाऊस, पाहिजे तसा सूर्यप्रकाश नसल्याने त्याचा मणी फुगवणीवर, साखर उतरण्यावर झाला आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात बºयाच ठिकाणी अनेक प्लॉटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यात अर्ली माल खुडत असल्याने त्यांचा मालदेखील लवकर तयार होत असतो. परंतु तेथेदेखील द्राक्ष माल कमी उत्पादित झालेला आहे.
कडाक्याच्या थंडीचा परिणाम
नाशिक जिल्ह्यातील अनेक निर्यातदारांनी जानेवारीत मालाची स्थिती
पाहून थांबण्याचे धोरण स्वीकारले असले तरी कडाक्याच्या थंडीमुळे
त्याचा मण्यांना तडे जाणे, अपेक्षित फुगवण न होणे, झाडाला अन्नपुरवठा
कमी होणे आदी बाबीवर होत आहे. यासर्व गोष्टींचा विचार केल्यास निर्यातदारांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली
असून, येत्या एक महिन्याच्या कालावधीत निसर्गाने योग्य साथ
दिल्यास दोन्ही द्राक्ष बाजारपेठा काही प्रमाणात स्थिर होण्याची
चिन्हे आहेत.
असे आहेत द्राक्ष प्रकार
भाव (प्रतिकिलो) फ्लेम- ७० ते ८०, थॉमसन- ९० ते ९५, पर्पल- ९५ ते १००, शरद सीडलेस- ८५ ते ९०