चांदवड येथे आढळला अतिविषारी चापड साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:24 PM2020-06-08T22:24:59+5:302020-06-09T00:00:28+5:30

चांदवड : येथील राहुड एमआयडीसी भागात अतिदुर्मीळ चापड जातीचा सर्प आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्र मुन्ना ...

Extremely venomous Chapad snake found at Chandwad | चांदवड येथे आढळला अतिविषारी चापड साप

चांदवड येथे आढळला अतिविषारी चापड साप

Next

चांदवड : येथील राहुड एमआयडीसी भागात अतिदुर्मीळ चापड जातीचा सर्प आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्र मुन्ना गोसावी, संदीप बडे यांना माहिती मिळताच त्यांनी हुसेन सय्यद, विजय बडोदे, दीपक धामोडे यांच्यासह धाव घेऊन त्यास पडकले. मुन्ना गोसावी यांनी सांगितले की, ग्रामीण भागात पहिल्यांदाच या जातीचा सर्प आढळून आला आहे. पकडण्यात आलेल्या सर्पाची लांबी तीन फूट सात इंच इतकी होती.
या सर्पास चांदवड येथील फॉरेस्ट अधिकारी श्रीराम महाले, वनरक्षक ज्योती सोनवणे, निरभवणे यांच्या स्वाधीन करण्यात आले. वनविभागाने सर्पाची नोंद करून त्यास जंगलामध्ये सोडून दिले. ग्रामीण भागात पहिल्यांदाच अतिविषारी जातीचा साप आढळल्याने हा साप पाहण्यासाठी दिंडोरीतील सर्पमित्र आले होते.

Web Title: Extremely venomous Chapad snake found at Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप