सुनसान जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:38 AM2017-10-11T00:38:16+5:302017-10-11T00:38:30+5:30
महसूल कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांचा शुकशुकाट असताना सकाळी ११ वाजता अचानक तिघे अतिरेकी गोळीबार करीत शिरले व तिघा कर्मचाºयांना डांबून ठेवत टाइमबॉम्ब ठेवतात आणि सुरू होते पोलिसांची धावपळ... सशस्त्र पोलीस व अतिरेक्यांमध्ये चकमक झडून सुमारे दीड तासानंतर तिघांना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी होतात.
नाशिक : महसूल कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांचा शुकशुकाट असताना सकाळी ११ वाजता अचानक तिघे अतिरेकी गोळीबार करीत शिरले व तिघा कर्मचाºयांना डांबून ठेवत टाइमबॉम्ब ठेवतात आणि सुरू होते पोलिसांची धावपळ... सशस्त्र पोलीस व अतिरेक्यांमध्ये चकमक झडून सुमारे दीड तासानंतर तिघांना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी होतात. अर्थातच यातील एकही गोष्ट खरी नाही, ही पोलीस, अग्निशामक, आरोग्य खात्याची रंगीत तालीम होती.
संयुक्त राष्ट्र संघाने १३ आॅक्टोबर हा दिवस राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन दिवस म्हणून जाहीर केला असून, त्या अनुषंगाने आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात रंगीत तालीम घेण्यात आली. अकरा वाजता अतिरेकी शिरल्याचा निरोप निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मिळताच त्यांनी तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांना त्याची सूचना दिली. कार्यालय सोडून सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले. तीन अतिरेकी कार्यालयात गोळीबार करीत शिरले व त्यांनी तिघांना बंधक केल्याचेही सांगण्यात आले. अवघ्या तीन मिनिटात सर्वजण कार्यालय सोडून बाहेर पडले. आपत्ती व्यवस्थापन, दहशतवाद विरोधी पथक, शिघ्र कृती दलाचे अधिकारी व कर्मचारी व कमांडोनी इमारतीस घेरले व त्यांनी तिघा दहशतवाद्यांना ठार करून तिन्ही बंधकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोध पथकाने प्रवेशद्वाराजवळ दडवून ठेवलेला बॉम्ब शोधक पथकाच्या सहाय्याने शोधून तो सुरक्षित स्थळी जाऊन निकामी केला. १२ वाजून २४ मिनिटांनी सर्व अधिकारी व कर्मचाºयांना सायरन वाजवून आॅल क्लिअरचा संदेश दिला. सदरच्या रंगीत तालमीत जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतुल जगताप, देशमुख, नीळकंठ दुसाने, अमृत पाटील, शरद घोरपडे आदी उपस्थित होते.