नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:17 PM2020-06-09T22:17:07+5:302020-06-10T00:09:13+5:30

नाशिक : मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही.

The eye donation movement should be more dynamic | नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी

नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी

googlenewsNext

नाशिक : (मुकुंद बाविस्कर) मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही. केवळ एक अर्ज भरून दिल्यानंतर कुणालाही मृत्युपश्चात नेत्रदान करण्यात करता येणे शक्य आहे. सध्याच्या काळात अंधत्वाच्या तक्रारीत वाढ होत असून, नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी, याकरिता नेत्रतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे.
नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी दि.१० जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येते. आपण घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्त्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाइल, इंटरनेट यामुळे अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. साधारणत: एक वर्ष वयापासून ते चांगली दृष्टी असल्यास ५० वय पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.
नेत्रदान हे मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह आणि चष्मा वापरणारी व्यक्तीही करू शकते. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाइकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा अर्ज भरून देणे ही काळाची गरज ठरली आहे.
---------------------
संपूर्ण जगात ४५ दशलक्ष दृष्टिहीन लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष दृष्टिहीन लोक हे भारतात आहेत. अनेक देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.
- डॉ. अमित धांडे, नेत्ररोगतज्ज्ञ

Web Title: The eye donation movement should be more dynamic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक