काबरा प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 04:26 PM2020-03-04T16:26:19+5:302020-03-04T16:26:34+5:30
मालेगाव : लायन्स क्लब आॅफ मालेगाव साउथ आणि बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने कै. ल. रा. काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील १ ली ते १० वीच्या १ हजार ५० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

गरजू विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नीलेश गांगुर्डे, डॉ. ललित आहेर, डॉ. कपिल श्रीराम, नेहा लोढा, प्रोजेक्ट चेअरमन रंजना काला, मोनिका दुसाने, प्रेरणा बाहेती, कृष्णा झंवर, ज्योती बाहेती तसेच क्लबचे अध्यक्ष राधेशाम काला, सेक्र ेटरी अमोल दुसाने, खजिनदार मनोज बाहेती, अशिष झंवर व पदाधिकारी उपस्थित होते. माध्यमिक शाळा समिती चेअरमन रविश मारु यांनी स्वागत केले. माध्यमिकचे मुख्याध्यापक नितीन हिरे, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुधीर ठाकूर, शिक्षिका सुनंदा जाधव, पर्यवेक्षक संजय शिंदे, शिक्षक प्रतिनिधी स्वाती बच्छाव, आरोग्य समिती प्रमुख जगन्नाथ शेवाळे, अश्विनी देवरे उपस्थित होते.