दिव्यांग विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी सेवेची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 10:22 PM2021-08-04T22:22:32+5:302021-08-04T22:24:00+5:30
दिंडोरी : समग्र शिक्षा अभियान, समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत तीव्र अपंगत्व असलेल्या अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना घरी जाऊन फिजिओथेरपी सेवा देण्याचे काम शिक्षक करत आहेत.
दिंडोरी : समग्र शिक्षा अभियान, समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत तीव्र अपंगत्व असलेल्या अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना घरी जाऊन फिजिओथेरपी सेवा देण्याचे काम शिक्षक करत आहेत.
गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, गट समन्वयक के.पी. सोनार यांच्या मार्गदर्शनखाली दिव्यांग विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील समावेशीत शिक्षण विभाग महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
यामध्ये विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, विशेष शिक्षक पौर्णिमा दीक्षित, रिना पवार, दीपक पाटील, समाधान दाते, वैशाली तरवारे, कल्पना गवळी, अश्विनी जाधव, प्रशांत बच्छाव, विपीन भामरे, श्रीकांत खलाने आदी सेवा देत आहे.
दिंडोरी तालुक्यात अतितीव्र अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना कोविडचे नियम पाळून घरी जाऊन सेवा दिली जात आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य, वर्तन समस्या आदींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांना भौतिक उपचार, फिजिओथेरपी सेवाही पुरविली जात आहे. फिजिओथेरपीमुळे विद्यार्थ्यांच्या स्नायूमधील दोष दूर होण्यास मदत होत आहे. स्नायूमधील ताठरता कमी करून बळकटी मिळण्यास मदत होते. तसेच त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय, शासकीय, मदतीबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.