रेल्वे भरती प्रक्रि येत आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 04:18 PM2018-12-27T16:18:43+5:302018-12-27T16:18:58+5:30
सटाणा : औद्योगिक प्रशिक्षण (आय. टी. आय.) घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयातर्फे पश्चिम रेल्वे विभागात ३५५३जागांसाठी भरती प्रक्रि या सुरू झाली आहे.
सटाणा : औद्योगिक प्रशिक्षण (आय. टी. आय.) घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयातर्फे पश्चिम रेल्वे विभागात ३५५३जागांसाठी भरती प्रक्रि या सुरू झाली आहे. बागलाण तालुक्यातील युवकांसाठी येथील मविप्र संचिलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मोफत आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती भूषण सोनवणे यांनी दिली.
आॅनलाईन अर्ज दाखल करतांना उमेदवारांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून मविप्र संचिलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी केंद्रातील इलेक्ट्रीशियन विभागातील निदेशक संजय देवरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही प्राचार्य सोनवणे यांनी केले आहे.