‘भाऊबंदकी’चा सामना

By admin | Published: November 15, 2016 12:43 AM2016-11-15T00:43:30+5:302016-11-15T00:39:49+5:30

सिन्नरकरांच्या नजरा : चोथवे बंधूंच्या लढाईसोबतच ‘अपक्षा’चा ‘कस’

Facing 'Brotherhood' | ‘भाऊबंदकी’चा सामना

‘भाऊबंदकी’चा सामना

Next

शैलेश कर्पे  सिन्नर
शहरात सर्वात लक्षवेधी आणि राजकीय प्रतिष्ठेची लढत प्रभाग ५ ब मध्ये होत आहे. सख्खे चुलतबंधू असलेल्या चोथवे या प्रतिष्ठित व व्यावसायिकांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी सामना रंगत आला आहे. शिवसेनेचे उमेदवार व नगरसेवक प्रमोद झुंबरलाल चोथवे यांच्या विजयासाठी आमदार राजाभाऊ वाजे यांची, तर भाजपाचे उमेदवार संजय गंगाधर चोथवे यांच्या विजयासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. चोथवे बंधूंच्या या कडव्या झुंजीत अपक्ष उमेदवार नगरसेवक हर्षद प्रभाकर देशमुख यांचाही कस लागणार आहे.
प्रभाग ५ ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी होणाऱ्या या लढतीत हायप्रोफाईल उमेदवार असल्याने शहरवासीयांच्या नजरा साहजिकच या लढतीकडे लागल्या आहेत. भाजपा, सेना, राष्ट्रवादी व अपक्ष असे चार उमेदवार एका जागेसाठी आपले नशिब अजमावत आहेत. एका जागेसाठी चौरंगी लढत दिसत असली तरी खरा सामना तिरंगी होणार आहे. भाजपाचे उमेदवार संजय चोथवे, शिवसेनेचे उमेदवार प्रमोद चोथवे व अपक्ष उमेदवार हर्षद देशमुख यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचा राजकारणातला दांडगा अनुभव असून, ते आमदार राजाभाऊ वाजे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात. प्रमोद चोथवे यांनी दोनवेळा लोकनियुक्त, तर एकदा स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेच्या कारभारात सहभाग घेतला आहे. गेल्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले व प्रमोद चोथवे यांची लक्षवेधी लढत झाली होती. त्यात प्रमोद चोथवे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर वाजे गटाकडून त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेवर वर्णी लावण्यात आली होती. समाजकार्यात अग्रेसर असणारे प्रमोद चोथवे शहरातील प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होतांना दिसतात. निम्म्या रात्री मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांना आपलेसा करतो. अनुभव, कार्यकर्त्यांचा संच, राजकारणातील खाचाखोचा, नित्यसंपर्क या जोरावर शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सेनेचे उमेदवार प्रमोद चोथवे यांचा सामना करण्यासाठी भाजपाने त्यांचे सख्खे चुलत बंधू व कापड व्यावसायिक संजय गंगाधर चोथवे यांना निवडणूक रिंगणात उतरवून लढतीत रंगत आणली आहे. व्यावसायिक असल्याने डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून संजय चोथवे प्रचारकार्यात सक्रिय झाले आहेत. गेल्या निवडणुकीत राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना संजय चोथवे यांनी माजी आमदार कोकाटे यांच्या गटाकडून ऐनवेळी उमेदवारी केली होती.

Web Title: Facing 'Brotherhood'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.