मुरु म, खडी महसूल कर न आकारता वाहतुकीस परवानगी मिळावी : मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:10 PM2019-08-10T22:10:30+5:302019-08-10T22:13:52+5:30
औंदांणे : बागलाण तालुक्यातील शेत रस्ते व पाधन रस्त्यांसाठी मुरु म, खडी वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचा महसूल कर न आकारता सरसकट वाहतुकीस परवानगी मिळावी याबाबत बागलाण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

बागलाण तालुक्यात सर्वत्र भीज पाऊस झालेला आहे. पावसामुळे शेत रस्ते व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल माती व खड्डे तयार झालेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना शेतीमाल काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शेत रस्ते, पाधन रस्ते करण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. शेत रस्ता, पाधन रस्ता दुरूस्तीसाठी शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांना महसुल भरु न परवानगी काढण्यासाठी पैसे नाहीत. याकामी तहसीलदार यांना आदेश काढून या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी खडी, मुरु म वाहतुकीस परवानगी देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, माधव पगार, दत्तु खरे, योगेश आहीरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.