फडणवीस ‘पुन्हा आल्या’ने जल्लोेष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:13 AM2019-11-24T01:13:44+5:302019-11-24T01:14:13+5:30

विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी (दि.२३) भल्या सकाळी शपथविधी झाल्यानंतर भाजपत उत्साह संचारला.

 Fadnavis shouted 'come back'! | फडणवीस ‘पुन्हा आल्या’ने जल्लोेष !

फडणवीस ‘पुन्हा आल्या’ने जल्लोेष !

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी (दि.२३) भल्या सकाळी शपथविधी झाल्यानंतर भाजपत उत्साह संचारला. दुपारी कार्यकर्त्यांनी एन.डी. पटेलरोडवरील पक्ष कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला. पक्षाचे आमदार आणि महापौरदेखील या नृत्य जल्लोषात सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहात अधिकच भर पडली. दरम्यान, एकीकडे हा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मात्र त्यावर राजकीय पडसाद उमटू नये, या पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेरच कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागला. याशिवाय राजकीय तणाव वाढून शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्यात सत्ता स्थापनेची अनिश्चितता वाढत असतानाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची नवीन समीकरणे आकारास येत होती. त्याच दरम्यान राजकीय नाट्य रंगले आणि सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपत उत्साह संचारला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हळूहळू कार्यालयात जमू लागले. नूतन महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, वसंत गिते, गिरीश पालवे, सुजाता करजगीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी दाखल झाले. यावेळी बोलताना सावजी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच जल्लोष करण्यास प्रारंभ केल्याचे सांगितले. मात्र, पक्ष कार्यालयासमोर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करायचा असल्याने सर्व कार्यकर्ते गोळा झाले असल्याने हा आनंद साजरा करणार असल्याचे सावजी यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले होते, मी येईन, मी पुन्हा येईन आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला, असेही सावजी यांनी नमूद केले. यानंतर ढोल-ताशांचा गजरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना देवेंद्र फडणवीस आगे बढोच्या घोषणा दिल्या.
दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीतील फुटिरांमुळे झालेल्या सत्तेमुळे शिवसेना आणि कॉँग्रेसमध्ये रोष व्यक्त केला जात होता. त्यातून शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नाशिकरोड बिटको चौकात पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाजीराव भागवत, सुनील आडके, संभाजी मोरूस्कर, शांताराम घंटे, पंडित आवारे, अंबादास पगारे, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांच्या विरोधात आंदोलन; पोलिसांमुळे रद्द
राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपबरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयामुळे राष्टÑवादीत चलबिचल सुरू झाली. अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी केली. मात्र त्यांंचे संभाव्य आंदोलन कळताच पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी तसेच शिरसाठ यांच्या कार्यालयात तळ ठोकला असून, त्यामुळे आंदोलन होऊ शकले नाही. 
नूतन महापौरांनीही धरला ठेका
शुक्रवारीच महापौरपदी विराजमान झालेल्या सतीश कुलकर्णी यांना दुसऱ्याच दिवशी या घडामोडींमुळे राज्यातील भाजप सरकार आणि नाशिकमधील महापौरपदी विराजमान होण्याचा एकत्रित जल्लोष करण्याची संधी लाभली. मग पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहानुसार महापौरांनीदेखील ढोल, ताशा आणि गुलालाच्या उधळणीत नृत्यावर ठेका धरून आनंद साजरा केला. उपमहापौर भिकूबाईदेखील आनंदोत्सवात सहभागी झाल्या होत्या.
आधी जल्लोष, मग शांतता
भाजपने सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याने जल्लोष साजरा केला खरा, मात्र दुपारी राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या एकत्रित बैठकीनंतर राष्टÑवादीतील अजित पवार यांचे बंड मोडण्यास सुरुवात झाली बहुतांशी राष्टÑवादीचे आमदार पक्षाच्या बैठकीसाठी हजर राहिल्याने मात्र नंतर भाजपत शांतता होती. तरीही आता बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही पक्ष करेल, असा विश्वास पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अनेक कार्यकर्ते कार्यालयात दूरचित्रवाणीवरील बातम्या बघण्यात व्यस्त होते.

 

Web Title:  Fadnavis shouted 'come back'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.