विश्वास उटगी : पॅनकार्ड क्लब कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक पैसे परत करण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:25 AM2017-12-02T01:25:30+5:302017-12-02T01:26:32+5:30

पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडून दिरंगाई होत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले अर्ज भरून सेबीच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात येणाºया मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले.

Failure to believe: Delayed money from PANCard Club Company for returning billions of frauds | विश्वास उटगी : पॅनकार्ड क्लब कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक पैसे परत करण्यास दिरंगाई

विश्वास उटगी : पॅनकार्ड क्लब कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक पैसे परत करण्यास दिरंगाई

Next
ठळक मुद्देगुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात आली नाहीराज्यात २७ लाख गुंतवणूकदार जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची बैठक

नाशिकरोड : पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडून दिरंगाई होत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले अर्ज भरून सेबीच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात येणाºया मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले.
पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत देशभरातून लाखो गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक केली आहे. सेबीने पॅनकार्ड क्लबला नोटीस पाठवून गुंतवणूक घेण्यास प्रतिबंध करून गुंतवणुकीची रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले होते; मात्र पॅनकार्ड क्लब कंपनीकडून गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात आली नाही. न्यायालयाने सेबीला मालमत्ता विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे अदा करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र सेबीकडून मालमत्तेचा कुठलाही लिलाव करण्यात आला नसून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. देशात जवळपास ५१ लाख व राज्यात २७ लाख गुंतवणूकदार आहे. यावेळी मुंबईचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अशोक गोरे यांनी उपस्थितांना कायदेशीर लढ्याबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर ए.एस. पेडणेकर, राजू देसले, सी.ए. मोरे, व्ही.सी. बेर्डे, के.ई. अपुल, ए.जी. मेना, एस.पी. निगळ, पी.डी. अपुल, पी.एस. पेटकर आदी उपस्थित होते. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्टर अ‍ॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून, इच्छामणी लॉन्समध्ये नाशिक जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली. बैठकीत बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी गुंतवणूकदारांना आपले अर्ज इन्व्हेस्टर ट्रस्टकडे जमा करण्याचे आवाहन केले. डिसेंबर अखेरपर्यंत सेबीच्या मुंबई बांद्रा येथील मुख्य कार्यालयावर गुंतवणूकदारांचा मोर्चा काढण्यात येणार असून गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उटगी यांनी केले.

Web Title: Failure to believe: Delayed money from PANCard Club Company for returning billions of frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा