बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:53 AM2018-08-21T01:53:44+5:302018-08-21T01:53:58+5:30
दसाणा लघु प्रकल्पात बुडून मृत्यू झालेल्या वैभव संजय सोनवणे (१९) या तरु णाचा मृतदेह दुसरा दिवस उलटूनही बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही.
वीरगाव : दसाणा लघु प्रकल्पात बुडून मृत्यू झालेल्या वैभव संजय सोनवणे (१९) या तरु णाचा मृतदेह दुसरा दिवस उलटूनही बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. नाशिक येथून आलेल्या पाणबुडी पथकाकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र अपयश आल्याने मंगळवारी पुन्हा मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे. या प्रकल्पाच्या बॅकवॉटर क्षेत्रात रविवारी (१९) दुपारी ४ वाजेच्या सुमारास वैभव सोनवणे हा तरुण मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला असता त्याचा गाळात पाय फसून बुडून मृत्यू झाला. यावेळी नागरिकांनी धाव घेऊन बुडालेल्या वैभवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सटाणा पोलिसांनाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ दाखल होत शोधमोहीम सुरू केली. यावेळी गावपरीसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी या प्रकल्पात उतरुन बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे त्यांनाही यश आले नाही. रात्री शोधमोहीम थांबवून सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तालुक्यातील लोहणेर या गावातील पोहणाºयांच्या माध्यमातून या युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न दिवसभर करण्यात आले. मात्र यात यश न आल्याने सोमवारी सायंकाळी अखेर नाशिक येथून पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून शोधमोहीम सुरू होती. प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी दिवसभर घटनास्थळी थांबून तालुका पोलीस यंत्रणा व आपत्ती निवारण विभागाला महत्वपूर्ण सूचना देऊन या मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न केला. सटाणा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दिवसभर धरण परिसरात बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.