थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:21+5:302021-02-11T04:15:21+5:30

सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठक घेण्यात आली. तालुक्यातील चोवीस तास पाणीपुरवठा करणारी ठाणगाव ही ...

Failure to pay the arrears will disrupt the water supply | थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करणार

थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करणार

Next

सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठक घेण्यात आली. तालुक्यातील चोवीस तास पाणीपुरवठा करणारी ठाणगाव ही एकमेव ग्रामपंचायत असून, या ग्रामपंचायतीची २० लाख रुपये घरपट्टी व ३३ लाख रुपयांची घरपट्टी थकलेली आहे. ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी थकीत पाणीपट्टीबाबत दंवडी देऊन व नोटिसा बजावून जनजागृती करण्यात आली. ज्यांची रक्कम दहा हजाराच्या पुढे आहे, अशा नळधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आठ दिवसांच्या आत थकबाकीधारकांनी थकबाकी भरली नाही, तर पाणीपुरवठा कनेक्शन खंडित केले जाणार आहे.

ग्रामस्थांनी टप्प्या-टप्प्यात घरपट्टी व पाणीपट्टी भरावी. पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहनही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणगावला उंबरदरी धरणाजवळील पाचगाव प्रादेशिक पाणीपुरवठा या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. योजनेचे वीजबिल मोठ्या प्रमाणावर थकलेले असून, त्यामुळे ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणीपट्टी जमा करावी. आगामी काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पाच हजारांच्यापुढे थकबाकी असणाऱ्या अडीचशे नळधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. ग्रामस्थांनी थकबाकी भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

इन्फो...

ठाणगावजवळील उंबरदरी धरणातून पाच गाव पाणीपुरवठा ही योजना सुरू असून, बारामाही चालणारी ही एकमेव योजना आहे. त्यामुळे योजना सुरळीत ठेवण्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. थकीत नळधारकांना वेळोवेळी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते, पण ग्रामस्थांकडून अपेक्षित वसुली न झाल्यामुळे पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

- डी.एस. भोसले, ग्रामविकास अधिकारी

Web Title: Failure to pay the arrears will disrupt the water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.