पोलिसांचे अपयश : इंदिरानगरच्या वृध्दा सोनसाखळी चोरट्यांकडून ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:52 PM2019-08-27T17:52:16+5:302019-08-27T17:59:54+5:30

सकाळ-संध्याकाळ त्यांची परिसरातील रस्त्यांवर वर्दळ असते. फेरफटका व गप्पागोष्टी करण्यासाठी ते एकमेकांची भेट घेतात. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Failure of police: 'target' by Indira Nagar's old women gold chain thieves | पोलिसांचे अपयश : इंदिरानगरच्या वृध्दा सोनसाखळी चोरट्यांकडून ‘टार्गेट’

पोलिसांचे अपयश : इंदिरानगरच्या वृध्दा सोनसाखळी चोरट्यांकडून ‘टार्गेट’

Next
ठळक मुद्दे दीड तोळे वजनाचे मंगळसुत्र ओरबाडून पळ काढला. हिलावर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक : येथील एका अपार्टमेंटच्या आवारात जाऊन एका वृध्देला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे ४५हजार रु पये किमतीचे मंगळसुत्र बळजबरीने ओरबडून नेल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर भागात सातत्याने सोनसाखळी ओरबाडून पोबारा करण्याच्या घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी कुलकर्णी (७०,रा.चेतनानगर) या अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या किराणा दुकानात सामान घ्यायला सकाळच्या सुमारास आल्या. सामान घेऊन त्या पुन्हा घराकडे परतत असताना घराजवळच त्यांना एका दुचाकीस्वााराने हटकले. काहीतरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करत त्यांचा विश्वास जिंक त नजर चुकवून तत्काळ त्याांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसुत्र ओरबाडून पळ काढला. सुदैवाने यावेळी कुलकर्णी यांचा तोल गेला नाही व त्यांना जबर दुखापत झाली नाही; मात्र या घटनेनंतर त्या प्रचंड घाबरल्या. इंदिरानगर परिसरात सोनसाखळी लांबविण्याच्या घटना चक्क नागरिकांच्या दरापुढे घडत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. यामुळे महिलावर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इंदिरानगर परिसर ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सकाळ-संध्याकाळ त्यांची परिसरातील रस्त्यांवर वर्दळ असते. फेरफटका व गप्पागोष्टी करण्यासाठी ते एकमेकांची भेट घेतात. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Failure of police: 'target' by Indira Nagar's old women gold chain thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.