कोरोनाच्या रोखण्यात राज्य सरकारला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:46+5:302020-12-03T04:24:46+5:30

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर भंडारी यांनी भाजपच्या वसंत स्मृती कायार्लयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. ...

Failure of state government to prevent corona | कोरोनाच्या रोखण्यात राज्य सरकारला अपयश

कोरोनाच्या रोखण्यात राज्य सरकारला अपयश

Next

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर भंडारी यांनी भाजपच्या वसंत स्मृती कायार्लयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. यावेळी व्यासपीठावर पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोरोनाशी लढण्यासाठी सर्वाधिक निधी दिला. परंतु त्यानंतरही उपाययोजना करण्यात सरकार कमी पडले. त्यामुळेच राज्यात ४६ हजार नागरिकांचा बळी गेला. केंद्राने दिलेल्या निधीचा विनीयोग नक्की कसा केला हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे सांगून त्यांनी केंद्राने जीएसटी थकविल्याचा आरोप दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले. जीएसटीत ५० टक्के रक्कम ही राज्याची राज्याकडेच राहत असते. केवळ केंद्र शासनाच्या भरपाईचा मुद्दा आहे. त्यातही सरकारने अल्पमुदतीचे कर्ज काढावे त्या बदल्यात केंद्र शासन हमी देण्यास तयार असल्याचे भंडारी म्हणाले.

राज्यातील सध्या सुरू असलेली आरक्षणांना विरोधकांची फूस असल्याचा आरोप फेटाळून त्यांनी राज्यात भाजप सरकार असतानादेखील अशाच प्रकारे आंदोलने सुरू होती, त्यावेळी असा आरोप कोणी केला नव्हता याचे स्मरण करून त्यांनी राज्याची सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून, २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप त्यांनी केला. अन्य राज्यांत उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचे भंडारी म्हणाले.

इन्फेा...

भाजपचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीत प्रविष्ट झालेले नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर पतसंस्थेसंदर्भात केलेल्या आरोपाबाबत बोलताना माधव भंडारी यांनी जेव्हा बीएचआरचा घोटाळा बाहेर आला तेव्हा खडसे हे मंत्रीच होते, त्यांनी काय केले? असा प्रश्न केला आणि त्यांना सर्व आरोप करू द्या, मग भूमिका मांडू असे सांगितले.

Web Title: Failure of state government to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.